माझ्या बागेत बरीच फुलझाडं आहेत.. त्यात बालसमचं प्रमाण जास्त आहे.. अबोली , पफ , नागफणी , मोगरा , कुंद , एक्झोरा , तुळस , जास्वंद अशी अनेक झाडे आहेत.. आता चार दिवस मी मुम्बईत होते त्यामुळे त्या झाडाना पाणी देण्याचं काम सोसायटीतील एका मुलीनं केलं..
रात्री अडीच वाजता आल्यावर मी घरात न जाता सगळ्या झाडापाशी जाऊन त्यांना भेटले .. अंधारात आणि डोळ्यावर झोप होती त्यामुळे लक्षात आलं नाही .. सदाफुली पाणी दिलेलं असुन सुकली होती जेव्हा सकाळी मी तिला पाहिलं तेव्हा लक्षात आलं की , सगळी झाडं चांगली आहेत हिच अशी अबोल का ??.. बहुधा रुसली असावी म्हणुन तिच्यापाशीं बसले आणि म्हटलं , काय झालं गं ??.. क्षितीजाने पाणी दिलं ना सगळ्याना असं म्हणत तिच्यावरुन हात फिरवला ..
मुळांशी खड्डा करत मुळांपाशी थोडी माती गोळा केली तिला म्हटलं , तुला पाणी मिळालं असेल पण मी जशी तुमच्याशी गप्पा मारते तसं कदाचित क्षितीजाने केलं नसेल म्हणुन राग आला का ??.. आता मी आलेय आणि रोज गप्पा मारु.. तु सदाफुली आहेस,, रोज अशीच फुलत रहा .. बहरत रहा आणि मला माफ कर..
आज सकाळी उठल्यावर जेव्हा मी तिच्यापाशीं गेले आणि सरप्राइज म्हणजे ती टवटवीत होती.. माझ्याकडे पाहुन हसत असावी असं वाटलं.. पुन्हा तिच्यापाशीं बसले आणि Thanku सखी इतकच म्हटलं.. असाच अनुभव मी एकदा जास्वंदीचा शेअर केला होता.. यामागे काय आहे माहीत नाही पण कुठेही अतिशयोक्ती न करता किस्सा शेअर करतेय..
माझ्याकडे येणाऱ्या मांजरी सुध्दा अशाच .. म्हणतात मांजर फक्त जागेवर प्रेम करते ,माणसावर नाही पण माझे अनुभव याच्या विरूध्द आहेत.. डॉगी तर जीव लावतातच ..
मला वाटतं सगळं आपल्यावरच आहे .. आपण जसं वागतो तसा निसर्ग रीॲक्ट होतो आणि निर्जीव वस्तु सुध्दा आपलसं करतात..
सोनल गोडबोले