उस्माननगर येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रतिसाद

 

कंधार ; प्रतिनिधी

उस्माननगर येथे शासन आपल्या दारी उपक्रम दि १६ जुन रोजी आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष म्हणून डॉ शरद मंडलिक उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रमासाठी आमदार श्मासुंदर शिंदे यांनी भेट देऊन उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम बोरगावकर तहसीलदार कंधार यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनाप्रमाणे गटविकास अधिकारी मांजरमकर, गटशिक्षणाधिकारी मधूकर मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चव्हाण सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम, विद्युत महावितरण उपविभागीय अभियंता सत्यवान राऊत , तालुका पशुधन अधिकारी भालके , तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधी संजय वारकड, यांनी सविस्तर आपआपल्या विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थित सर्वांनी दिली. तसेच माधव पवार संगायो प्रमुख, लखमावाड पुरवठा प्रमुख यांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी शासन आपले दारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच ठिकाणी तात्काळ सोडवण्यासाठी 12 विभागाचे स्टाॅल लावण्यात आले होते. नागरिकांनी सदरील स्टॉलवर नियुक्त कर्मचारी यांना समस्या सांगितल्या.

स्टॉल प्रामुख्याने निवडणूक माहिती स्टॉल, संगायो योजना माहिती स्टॉल, घरकुल योजना माहिती स्टॉल, मग्रारोहयो माहिती स्टॉल, पी. एम. किसान माहिती स्टॉल, पुरवठा योजना माहिती स्टॉल, नैसर्गिक आपत्ती माहिती स्टॉल, कृषी विभाग माहिती स्टॉल, शिक्षण विभाग माहिती स्टॉल पशुधन अधिकारी माहिती स्टॉल आरोग्य तपासणी स्टॉल, खत बियाणे वाटप माहिती स्टॉल, पोस्ट कर्मचारी स्टॉल, आॅनलाईन प्रमाणपत्र वितरण स्टॉल, इ स्टॉल लावण्यात आले होते.

सदरील स्टॉलवर जवळपास १५०० नागरिकांनी भेट देऊन माहिती मिळवली
सदरील कार्यक्रमासाठी पुरवठा नायब तहसीलदार संतोष कामठेकर, उस्माननगर च्या सरपंच गयाबाई घोरबांड, वारकड गुरुजी,उस्माननगर चे मंडळाधिकारी शिवदास पटणे, पानपट्टे अविनाश, तलाठी पवार मॅडम, तहसील कार्यालयात सर्व तलाठी मंडळाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन थोटे मन्भथ भिमराव समन्वय यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *