मोदी @ 9 अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या चालण्याच्या स्पर्धेचे प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड ; प्रतिनिधी

मोदी @ 9 अंतर्गत भाजपच्या योग सप्ताहात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या चालण्याच्या भव्य स्पर्धेचे उद्घाटन योग सप्ताहाच्या संयोजक प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले असून स्पर्धेत ३२२ स्पर्धकांनी भाग घेत भरभरून प्रतिसाद दिला.सतत २१ व्या वर्षी विविध १० गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुलतर्फे मोबाईल पारितोषिके देण्यात आली.

रविवारी सकाळी श्रीराम सेतु पुल, गोवर्धन घाट नांदेड येथे भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
भाजपा संघटन मंत्री संजय कोडगे हे होते.महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विविध दहा गटात संतोष चेनगे, प्रियंका मामीडवार, आनंद सोनटक्के, माधव हुलगंडे, अरविंद मस्के, संजीवनी चव्हाण, शीला भालेराव,जयश्री उन्हाळे,संतोष चेनगे,मोहन पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला.डॉ. सचिन उमरेकर,शिक्षण तज्ञ बालासाहेब कच्छवे, प्रकाशसिंह परदेशी, सुरेश लोट, विक्रांत देशपांडे, शशिकांत घोरबांड, नीता दागडिया, जयश्री ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. चुरशीच्या लढतीत दिगंबर शिंदे, संभाजी शादुलवाड, बालाजी लाटकर, विष्णू भंडारी, वैशाली बामनकर, सीमा निरणे, वैष्णवी कोडगिरे, सावित्री सिताफळे, बालाजी लाटकर, कैलास जायभाये यांनी दुसरा क्रमांक मिळवला.सुभाष देवकते, सुप्रिया क्षीरसागर,सीमा निरणे,चंद्रभान सूर्यवंशी, पंढरीनाथ कंठेवाड,चक्रधर खानसोळे, विष्णू भंडारी, अनिता गुप्ता, शिल्पा भालेराव, दामोदर मुंडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.प्रत्येक गटातील यशस्वी तिघांना मंगल कार्यालय व टेन्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफीज देण्यात आल्या.भाजपचा झेंडा दाखवून विविध गटाच्या स्पर्धेची सुरुवात ॲड. चिरंजीलाल दागडिया, महेश खोमणे,डॉ. शितल भालके, अनुराधा गिराम,अपर्णा चितळे, प्रगती नीलपत्रेवार, राजेश यादव यांच्या हस्ते करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेचे अतिशय रंगतदार संचलन धीरज स्वामी व जेष्ठ पत्रकार दिगा पाटील यांनी केले. पंच म्हणून अरुण काबरा,गजानन मामीडवार, बालाजी कवानकर, कालिदास निरणे,सुधाकर ब्रह्मनाथकर यांनी चोख कामगिरी बजावली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुहास क्षीरसागर,तिरुपती गुट्टे, लक्ष्मीकांत पाठक , सुरेश दलबसवार,अरुण लाठकर, शशिकांत कुलकर्णी,संतोष भारती यांनी परिश्रम घेतले. नागरिकांना चालण्याची सवय लागावी यासाठी दिलीप ठाकूर हे २१ वर्षापासून सातत्याने स्पर्धा घेत असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

( छाया: धनंजय कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *