बाप नावाचा देवमाणूस…!!!

 

खरचं बाप म्हणजे काय असतो, चारओळीमध्ये तो सामावणार नाही एवढं त्याच श्रेष्ठत्व आभाळा एवढ अथांग असत…आईला घराच मांगल्य मानतात पण,बाप तर त्या घराच अस्तित्व असतो.पण,ते अस्तित्व आपण मान्यच करत नाही,संसाररुपी घराचा बापच असतो पाया.मुलांच्या भविष्यासाठी तो स्वता:च होतो रिता.आई संस्कार देते तर वडिल कर्तव्याची जाणीव देतात.बाप…वटवृक्षासमान असतो.पण,त्याच महत्व असतांना नाही तर त्याच महत्व गेल्यावर कळत.संकटाच्या छाताडावर चालून जाऊन कुटुंबाच्या सुखासाठी झटणारा बापच असतो.मराठी साहित्याने नेहमीच आपल्या खजान्यातून प्रत्येक नाते समृध्द केले.म्हणून तर आपण संतज्ञानेश्वरांना माऊली अन संतांना मायबाप म्हणतो.
आई वडिल आपणा सर्वांनाच कळतात…तरीही आई-वडिल समजून सांगावे लागतात ही खूप मोठी शोकांतिका आहे?आयुष्यामध्ये आईला महत्व देतांना आपण वडिलांना कधी विसरतो हे कुणाच्या लक्षात देखील येत नाही.कारण…बापाच अस्तित्व कायम दुर्लक्षीत राहिल.
राम हा कौसल्याचा पुत्र असला तरी,पुत्रवियोगाने तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.जिजाऊने शिवबाला घडवले पण…बाप लेकाची इतिहास घडवणारी शिव,शंभु ही जोडी आपल्यापुढे आजही आदर्श आहे.डाॅ.बाबासाहेबांना घडवणारे रामजीबाबा आठवले की उर अभिमानाने भरून येतो.आपल्याला बोट धरुन चालायला शिकवणारा,पडलो,धडपडलो तर उठायला लावणारा बापच असतो.तरीपण बापाच बाप पण कळायला वेळ लागतो.आणि ज्याला बाप कळला नाही त्याच्यासारख दुर्भाग्य दुसरे नाहीच.जगाच्या बाजारात सर्वकाही मिळेल पण आईची माया आणि वडिलांच प्रेम कितिही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.म्हणूच वेळीच त्यांच महत्व जाणा.त्यांच्यासाठी जेवढ करता येईल तेवढ करा.आयुष्य हे एकदाच मिळत…त्यामूळे बाप नावाच्या देव माणसाला जपा…!!!

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *