अहमदपुर शहरामध्ये सध्या गरमिचे व तापमानाचे प्रमाण खुप वाढल्यामुळे वन्यजीव हे पाणि आणी आश्रयासाठी वस्त्यांनमध्ये घुसत आहेत ,यांचे जिवंत ऊदाहरण आज समोर आले अहमदपुर शहरातील लातुर रोडवरील असलेले इंडिया अटोमोबाईल्स मध्ये ऊदमांदर (मरलांगी )घुसल्याची घटना समोर आली ,व तेथिल कामगारांनी विचित्र प्राणी दिसल्यामुळे घाबरुन आजुबाजुला चौकशी करुन तालुक्यात कार्यरत असलेले वन्यजिवप्रेमी सर्पमित्र सिध्दार्थ काळे शेलदरा यांच्याशी संपर्क केला सिध्दार्थ काळे हे हातातील काम जागीच टाकुन थोड्याच वेळामध्ये विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले घटना स्थळी पहानी केली असता ते ऊदमांजर (मरलांगी) असल्याचे समोर आले व त्या ऊदमांजरास यशस्वीरित्य पकडुन सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी सर्व कामगारांच्या मनातिल भिती दुर करुन त्याच्याविषईश्रधा अंधश्रधा गैरसमज दुर केले व त्या ऊदमांज सविस्तर माहिती सांगुन वनविभागीय अधीकार्यांच्या मदतिने जंगलात सोडन्यात आले, सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी सविस्तर माहिती अशी दिली की ऊदमांजर (मरलांगी)हा प्राणी संपुर्ण भारतासमवेत अशीयाई देशामध्ये आढळतो त्याला इंग्रजीत एशियन पामशिवेट तर ग्रामिन भागामध्ये मसन्याऊद,ऊदबिला ,मरलांगी असे म्हनतात लांबलचक शरिर असनारा ऊदमांजराची डोके ते शरीर लांबी ४८सेंमी असते
उदमांजराच्या अंगावर काळसर व राखाडी केस असतात. उदमांजराचे वजन साधारणपणे ३ ते ५ किलो असते. उदमांजर हा निशाचर प्राणी असुन तो मानवी वस्तीजवळ व जंगलांमधे ही आढळतो. सहसा दिवसभर झाडांवरील ढोलींमधे आराम करून रात्रीच्यावेळी हा प्राणी खाद्याच्या शोधात फिरतो. उदमांजर हा सर्वहारी प्राणी असुन त्याच्या आहारात शाकाहार व मांसाहार या दोन्हींचा समावेश असतो. फळे, किटक, बेडूक, सरडे, उंदिर, खेकडे इत्यादींचा त्याच्या आहारात समावेश असतो. उदमांजराविषयी आपल्या समाजात प्रचंड गैरसमज असुन या गैरसमजांमुळे लोकं उदमांजराला घाबरतात व त्याच्या जिवावर उठतात. उदमांजर पुरलेले प्रेत उकरून खातो खासकरून लहान मुलांचे प्रेत, उदमांजर लहान मुलांवर हल्ला करते असे गैरसमज असल्यामुळे हकनाक हा निरूपद्रवी प्राणी मारला जातो.
सर्पमित्र सिद्धार्थ काळे पुढे असेही म्हणाले की, आपल्या परिसरात जखमी पशु-पक्षी अथवा साप आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधावा
मो नं.9623729438