फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ पासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कंधारेवाडी येथील अंकुश काशिनाथ कंधारे हे अल्प भुधारक शेतकरी यांची कन्या कु.ज्योती अंकुश कंधारे हीने निट परीक्षेत 720 पैकी 563 गुण घेउन देशात 53625 वा क्रमाक मिळवला अंकुश कंधारे यांना एक मुलगा व दुसरी मुलगी असे अपत्य असुन या दोघाचेही प्राथमिक शिक्षण गावातच म्हणजे कंधारेवाडी येथील जि.प. प्रा.शा.येथे पाचवी पर्यत शिक्षण घेतले व नंतर दहावी पर्यतचे शिक्षण तिने कंधार येथील महात्मा फुले विद्यालयात घेतले दहावीला तिने 90% गुण घेउन उर्तीण झाली व नंतर 11वी 12 वी तिने कंधारेवाडी येथीलच विद्यासागर व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेउन घरीच अभ्यास केला अंकुश कंधारे व त्यांची पत्नी गंगाबाई कंधारे हे मुलीला आपल्या सोबत दररोज शेतात घेउन जायचे एक दिड एकर शेतातच त्यांनी मेहणत करायची त्यांची मुलगी ज्योती सुद्भा आई वडीला सोबत दिवसभर काम करायची व रात्रीला चार पाच तास अभ्यास करायाची बारावीच्या परीक्षेत तिने काॅलेज न करता घरीच बसुन अभ्यास केला
व 68% गुण घेउण उर्तीण झालि कंधारे यांच्या कुटुबात तिन चार पिड्यापासुन कुणीही शासकिय नौकरीला नाही वडील अंकुश कंधारे यांच शिक्षण अकरावी पर्यतच झाले पुढे त्यांची शिकण्याची ईच्छा होती पण परीस्थीत बिकट असल्यामुळे पुढील शिक्षण घेउ शकलो नसल्याचे ज्योतीचे वडीलाने सांगितले मुलगा दहावी करून आय टी आय करुन एका कंपनीत दहाहजार रु पगारावर काम करतोय मुलीलाही शिक्षण साठी खर्च येतोय एवढा खर्च कुठुण करावा म्हणुन त्यांनी मुलीला गावातीलच काॅलेज मध्ये तेही घरी बसुनच तिने परीक्षा दिली व घरीबसुनच निटचा अभ्यास केली पहील्याच बारीत तिने 720 पैकी 563 गुण घेउन वैदकिय अभ्यास क्रमाचा प्रवेश घेण्यासाठी ती आत्ता पात्र ठरली आहे विषेश म्हणजे गावातुन ही पहीलीच मुलगी आहे
की वैदकिय आभ्यास क्रमाला लागनारी
ज्योती म्हणाली मला डाॅक्टर होउन गोरगरीबाची सेवा करायची आहे मी सतत नउ तास अभ्यास करायची माझ्या घरची परीस्थीती हल्लाक्याची होती मला मिळाले श्रय माझ्या आई,वडील,भाउ,व चुलता चुलतीना देते जिद्यीने अभ्यास केल्यास कुठलेही कल्स लावण्याची गरज नाही असेही तीने सांगीतले मेहणतीला फळ नक्कीच मिळते अशीही ती म्हणाली.