वडीलाच्या अपघाताचा कुटुंबावर आघात असतानाही प्रतिक टापरेने निट परीक्षेत घेतले 600 गुण..

 

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील रुई येथील असलेला प्रतिक मन्मथराव टापरे हा लहाणपणापासुनच अंत्यत हुशार , शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक विद्यार्थी . प्रतिक दहावीला असतानाच त्यांच्या वडीलाचा अपघात झाला त्यांना दवाखाण्यात अडमिट केले आणि जवळपास त्यांची तब्येत दोन वर्ष ठिक नसल्यामुळे या कुटुंबियांवर चांगलाच आघात झाला होता.

अशा परिस्थितीत ही प्रतिकने केवळ बुद्धीच्या जोरावर हे यश प्राप्त केले वडीलाची तब्येत ठिक नसताना घरची परीस्थीती प्रतिकुल असताना पहील्याच प्रयत्नात सर्व सुख सोयी असनार्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना लाजवेल असे यश प्राप्त केले. या यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे दोन्हि काका नागनाथ टापरे व पंढरीनाथ टापरे यांच्यासह मामा ज्यू. इंजि.भगवान शेंबाळे फुलवळकर यांनी वेळोवेळी त्यांना धिर देत मला मार्गदर्शन केले असल्याचे बोलून दाखवले.

 

प्रतीक ने पुढे बोलताना सांगितले की , मी दहावीला 99.80% गुण घेउन उर्तीण झालो त्यानंतर माझ्या वडीलाचा अपघात झाला तेंव्हा आमचे कुटुंब हवालदिल झाले होते , परंतु माझ्या सर्व नातेवाईकांनी मला त्यांनी धिर दिला असल्याचे प्रतिक म्हणाला. जेव्हा माझ्या वडीलाचा अपघात झाला तेव्हा त्या हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टरांनी माझ्या वडीलाला त्या अपघातातुन सुखरुप बरे केले तेव्हाच मी ठरवल की आपण ही डॉक्टर होउन गोरगरीबाची सेवा करावी गरजूंना मदतीचा हात द्यावा. तेंव्हापासून मी सतत अभ्यास करायाचो मला 12 वीला 81% घेउन उर्तीर्ण झालो व पहील्याच प्रर्यत्नात मी निटची परीक्षा दिली व त्यात 720 पैकी 600 गुण मिळाले , आपणही शिकुन डाॅक्टर च बनायच हा दृढविश्वास ठेउन अभ्यास केला व मला निट मध्ये चांगले गुण मिळाल्याच त्यांनी सांगितल आपणच ठरवायच असत की आपण काय करायच हि जिद्द ठेवल्यास यश मिळतच असे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *