कंधार ; प्रतिनिधी
केंद्रातील सरकार अंत्योदयाचा विचार करणारे सरकार आहे जनसामान्याचे जीवनमान कसे उंचवता येईल व देशातील प्रत्येक नागरिका देशाचा कणा असून देशाच्या विकासामध्ये त्याचा महत्त्वपूर्ण योगदान आहे ही भावना मनामध्ये ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या काळामध्ये विकास व गरीब कल्याण यासाठी प्रयत्न करत आहेत असे प्रतिपादन खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लाभार्थी मेळाव्या दरम्यान कंधार येथे केले
केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंधार लोहा विधानसभेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये केंद्र शासनाचे अनेक जनकल्याणकारी योजनेचा लाभ मिळाला अशा लाभार्थ्यांचा मेळावा दिनांक 18 जून रोजी कंधार येथील संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे घेण्यात आला यावेळी नांदेड लोकसभेचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर लातूर लोकसभेचे खा सुधाकरराव शृंगारे, नांदेड जिल्हा महानगराध्यक्ष प्रवीण साले ,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी सदस्य प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, बाळू खोमणे, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी ,जिल्हा सरचिटणीस डॉ माधव पाटील उच्चेकर ,यांच्या उपस्थितीमध्ये लोहा विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांनी लाभार्थी संमेलनाचे आयोजन केले होते यावेळी खा सुधाकर शृंगारे यांनी लातूर लोकसभेमध्ये केलेल्या विकास कामाचे माहिती उपस्थितांना दिली तर प्रवीण साले यांनी नऊ वर्षांमध्ये जनसामान्याचे हिताचे कार्य नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात कसे झाले याची माहिती दिली तर डॉ माधव पाटील उचेकर यांनी विविध योजनांच्या लाभांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान कसे उंचावले गेले असे याची माहिती दिली .
प्रदेशाच्या कार्यकारणी सदस्य प्रणिताताई देवरे यावेळी बोलताना म्हणाल्या की देशभरातील सर्व नागरिक हे कुठल्या ना कुठल्या लाभाचे लाभार्थी आहेत देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना काळात धान्य असेल, वॅक्सिन असेल उज्वला गॅस योजना, घरकुल योजना, स्वच्छालय योजना असेल किंवा राष्ट्रीय पेजल योजना असेल याचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकांना मिळाला आहे यातूनच भारतीय जनता पार्टी सेवा समर्पण व सुशासन हे ब्रीदवाक्य समोर ठेवून काम करत आहे असे यावेळी त्या म्हणाल्या
यावेळी प्रास्ताविकात विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर म्हणाले की आज संपूर्ण देशातील नागरिक कुठल्यानं कुठल्या योजनेचा लाभ घेतले आहेत त्यात कोरोना प्रतिबंधक लस हि संपूर्ण भारतीयांनी घेतली त्या मुळे संपूर्ण देश हा लाभार्थी आहे,लोहा कंधार विधानसभेमध्ये खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाची माहिती यावेळी दिली दिव्य व गेल्या साठ वर्षांमध्ये जेवढा विकास या मतदारसंघाचा झाला नाही तेवढा विकास केंद्र सरकारच्या मदतीने केला गेला असे ते म्हणाले
या वेळी भारतीय जनता पार्टी लोहा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर ,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड,उपसभापती नरेंद्र गायकवाड, कंधार शहर अध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यन्नावार,युवा मोर्चा ता.अध्यक्ष साईनाथ कोळगिरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर,किशन डफडे,आसिफ शेख,श्रीराम जाधव,मधुकर डांगे,राजहंस शहापुरे,बाळु धुतमल,सोशल मिडियाचे अँड सागर डोंगरजकर, माधव गुंजाळे, बालाजी पवार, कैलास नवघरे, प्रकाश घोरबांड, माधव पाटील डोंगरगावकर ,बालाजी तोटावाड , अविनाश पवार, सचिन मुकदम, सुरेश गायकवाड ,दत्ता वाले, भास्कर पवार ,शामसुंदर शिंदे,सय्यद अमजद,जाफर शेख,आदि कार्यकर्ते उपस्थितीत होते