मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नागपूर येथे घेतली भेट ..!

 

माळेगाव ते वाकाफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याची केली आमदार शिंदे यांनी मागणी

कंधार ;प्रतिनिधी

नागपूर येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची नागपूर येथे लोहा कंधार मतदारसंघातील विविध प्रलंबित रस्ते विकासासाठी मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी नामदार नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली या भेटीत नॅशनल हायवे क्रमांक 361 माळेगाव ते नॅशनल हायवे क्रमांक 161 वाका फाटा हा महामार्ग नॅशनल हायवेला जोडावा अशी मागणी करून मतदार संघातील माळेगाव, हिराबोरी तांडा, डोंगरगाव, चोंडी, दगडसांगवी, उमरज ,पाताळगंगा ,
संगमवाडी, घोडज, कंधार, बाचोटी, मंगलसांगवी, सावळेश्वर, चिखली, हाळदा, लाडका, उमरा, जोमेगाव, वाका फाटा ही सर्व गावे व या गावाच्या लगतच्या अनेक गावे ही राष्ट्रीय महामार्गाला जोडले जातील व या भागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या अत्यावश्यक सेवा रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी,जलद गतीने दळणवळणासाठी या राष्ट्रीय महामार्गाचा या भागातील नागरिकांना मोठा फायदा होईल अशी मागणी आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली,व सदरील कामाचे निवेदन आमदार शिंदे यांच्या हस्ते नामदार नितीन गडकरी यांना देण्यात आले,

 

यावेळी नामदार नितीन गडकरी यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांची ही मागणी तात्काळ मान्य करून हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन नामदार गडकरी यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना दिले ,या अगोदरही आमदार शिंदे यांनी नांदेड देगलूर राष्ट्रीय महामार्गाला समृद्धी महामार्ग जोडण्याची मागणी केली होती, आमदार शिंदे यांनी मतदारसंघातील विविध रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ही ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली होती आणि बऱ्याच मागण्या लोहा कंधार मतदारसंघातील मान्यही केल्या असल्याची माहिती लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यवेक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *