स्त्रीचे स्त्रीला आकर्षण असते का ??
माझ्या वाचक सखीने विचारलेला प्रश्न..
माझ्या मते नक्कीच असु शकतं..पण ते आकर्षण नक्की कशा प्रकारचे असेल हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे..
जसं मी लेखिका म्हणुन वाचक मैत्रीणीना आवडते ,, एखादीचा स्वभाव आवडु शकतो.. एखादीची फिगर आवडु शकते.. सुंदर उरोज आणि कमनीय बांधा मला स्वतःला आवडतो..अशा स्त्रीच्या प्रेमात मीही पडु शकते.. व्यायाम करणाऱ्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या असणाऱ्या स्त्रीया मला खुप आवडतात.. स्वतःवर प्रेम करणाऱ्या स्त्रीया जास्त भावतात..
व्यक्ती तितक्या प्रकृती असल्या तरिही लेस्बीयन किवा पार्टनर म्हणून स्त्रीला स्त्री आवडु शकते का ?? तर त्याचंही उत्तर हो असच आहे.. तो त्यांचा कंफर्ट झोन असेल.. काही स्त्रीयांना पुरुष आवडत नाहीत त्यामागे त्यांचे काही अनुभव असतील.. एखाद्या पुरुषाकडुन तिला किवा जवळच्या स्त्रीला झालेला त्रास तिने पाहिला असेल म्हणुन तिला पुरुषांची घृणा वाटत असेल.. प्रत्येकीला आलेल्या अनुभवानुसार ती वागत असते. तिला स्त्रीसोबत वेळ घालवायला आवडत असेल.. त्या दोघीना रोमॅंस करायला आवडत असेल.. पण मला वाटतं स्त्री पुरुष आकर्षण आहे ते २ स्त्रीयामधे कसं येत असेल माहीत नाही.. किवा २ पुरुषांमधे सुध्दा..
कधी यांना मनोरुग्ण म्हटलं जातं,कधी फॅंटसीज म्हटलं जातं तर कधी टिंगल केली जाते.ज्याला जसं दिसतं तसं लोक व्यक्त होतात.. पण तरीही व्यक्त होताना समोरच्याला आपण दुखवत नाही ना याचा जरुर विचार करायला हवा..
व्यक्तीस्वातंत्र्य आहे खरं , पण तरीही आपल्याला भान असणं गरजेचं आहे.. स्त्री पुरुषाचा स्पर्श हा नैसर्गिक आहे.. आणि निसर्गाच्या विरूध्द जाऊन आपण वागलो कि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतातच.. एखाद्या पुरुषाच्या मिठीत जाणं आणि स्त्री स्त्रीच्या मिठीत जाणं हा नक्कीच मोठा फरक असावा.. स्पर्श काय भावनेने केला जातो यावर सगळं अवलंबून आहे..
मुली आईची मिठी
दोन बहीणींची मिठी
दोन मैत्रीणीची मिठी
यात पावित्र्य असतं.. पण प्रत्येकीला त्या स्पर्शाची गरजही असते.. नात्यानुसार स्पर्श बदलतो..तिला नक्की कुठल्या स्पर्शाबद्द्ल विचारायचं होतं माहीत नाही मला जमेल तसं लिहायचा प्रयत्न केला आहे..
मित्रांनो तुम्ही मला रोज वेगवेगळे विषय देता त्यामुळे माझाही अभ्यास होतो.खुप खुप आभार ..
सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री