कंधार ; प्रतिनिधी
अखंडितपणे सतत नऊ वर्षापासून नवोदयचा सर्वोत्कृष्ट निकाल देणारी महाराष्ट्रातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल. आतापर्यंत नववर्षामध्ये या शाळेतून नवोदय विद्यालयासाठी 66 विद्यार्थी पात्र झालेले असून त्यात याही वर्षी तीन विद्यार्थ्यां नववी चे व 6वी वर्गासाठी 4विद्यार्थी ची भर पडून ती संख्या आता 73 झालेली आहे. यामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी चे विद्यार्थी समाविष्ट आहेत.
शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये इयत्ता 6वी चा आजच निकाल जाहीर झाला त्यामध्ये 1)स्वराज साईनाथ शिन्दे(2)केदार आनंदा पांचाळ (3) हानमंत पांडुरंग चेरले.( 4) अनिरुद्ध अशोक बनसोडे या चार मुलांची पहिल्या यादीत निवड झाली आहे तसेच नववी साठी 3 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. नवोदय विद्यालय शंकरनगर मध्ये 5 जागा रिक्त होत्या. त्यातून परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज ता कंधार जिल्हा नांदेड शाळेतील नववीतील 3 विद्यार्थी पात्र झालेले आहेत.
1) वेदांत पांडुरंग केंद्रे
2) वैष्णवी गोविंदराव कौसले
3) यशोदा विठ्ठल कौसले हे तीन विद्यार्थी यशस्वी
झाल्यामुळे परफेक्ट इंग्लिश स्कूलच्या निकालाची गुणवत्ता आणि नवोदय विद्यालयासाठी पाठवण्याची सरासरी ही 50% पेक्षा जास्त ठरलेली आहे.
नवोदय प्रवेश परीक्षा सोबतच चंद्रपूर आणि सातारा सैनिक शाळेसाठी ही या शाळेचा निकाल सर्वोत्तम आहे शैक्षणिक वर्ष 2022 23 परफेक्ट इंग्लिश स्कूलचे एकूण 27 विद्यार्थी सातारा व चंद्रपूर सैनिकी शाळेसाठी पात्र झालेले आहेत. त्यामध्ये पाच मुलांची निवड झाली आहे 1) शैलेश नामदेव दामले 272
2)माहीविष शेख 234
3) अनिरुद्ध अशोक बनसोडे 230
4)वैदांन्त पांडुरंग केंद्रे 346
5) शुभम नामदेव केंद्रे 334 त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुद्धा आतापर्यंत 246शिष्यवृत्ती धारक होऊन या शाळेचा निकाल जिल्ह्यामध्ये अवल आहे.
थोडक्यात सांगायचं म्हणजे परीक्षा कोणतीही असो सर्वोत्कृष्ट निकाल देणारी एकमेव शाळा म्हणजे पेठवडज येथील परफेक्ट इंग्लिश स्कूल. मागील नऊ वर्षापासून सबंध महाराष्ट्र मध्ये परफेक्ट इंग्लिश स्कूलचा नवोदय पॅटर्न सैनिकी शाळेचा पॅटर्न हा प्रत्येक शाळेत चर्चेचा विषय ठरलेला आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा स्वतःचा वेगळा पॅटर्न निर्माण करणारी महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे.