पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता कधी मिळणार..?    नांदेड दौऱ्यात मुख्यमंत्री १४ व्या हप्त्याबद्दल व राज्य सरकारने जाहीर केलेल्या २ हजार रुपये च्या हप्त्याबद्दल काही बोलणार का या बाबतीत पात्र लाभार्थ्यांना लागली चिंता..

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

     केंद्र सरकारच्या वतीने गेली ५० – ५५ महिन्यांपासून देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना राबविण्यात येत असून दर चार महिन्याला म्हणजेच वर्षातून तीन वेळा पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकार प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रक्कम जमा करत आहे , असे आजपर्यंत एकूण १३ हप्ते पूर्ण झाले असून लवकरच १४ वा हप्ता  पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा महिनाभरापासून असल्याने ते नक्की आमच्या बँक खात्यात कधी जमा याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

      गेल्या दोन वर्षांपासून पीएम किसान योजनेची नवीन नाव नोंदणीच्या कांही तांत्रिक अडचणीमुळे अनेक गरजू लाभार्थी या लाभांपासून वंचितच आहेत तेंव्हा याकडे सरकार व संबंधित प्रशासन कधी लक्ष घालणार ? असा सवाल ही गरजू , पात्र शेतकरी लाभार्थ्यांकडून विचारला जात असून शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री दि .२५ जुन रोजी रविवारी नांदेड जिल्ह्यात येत असल्याने ते तरी आमची दखल घेतील का ..? अशी भावना सदर योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांकडून ऐकायला मिळत आहे.

     गेल्या चार-साडेचार वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या वतीने अल्पभूधारक , गरजू शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीसाठी पीएम किसान योजनेची अंमलबजावणी व थेट सुरुवात करण्यात आली. या योजनेतून गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर चार महिन्याला केंद्र सरकार प्रत्येकी दोन हजार रुपये त्या त्या पात्र लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करायला सुरुवात केली. आजपर्यंत असे एकूण १३ हप्ते पूर्ण झाले , आता लवकरच १४ वा हप्ता त्या त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याची चर्चाच सध्या ऐकायला मिळत असून प्रत्यक्षात मात्र ते कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

     अशीच योजना आता नव्याने महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली असून त्यात राज्य सरकारकडून ही दोन हजार रुपये सदर पात्र शेतकरी लाभार्थ्यांना थेट मिळणार असल्याचे जाहीर केले असले तरी राज्य सरकारचे हे दोन हजार रुपये कधीपासून मिळतील याबाबत ही शेतकरी लाभार्थ्यांत अजूनही संभ्रमच असून त्यावरही आज मुख्यमंत्री काही बोलतील का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *