समग्र लीला चरित्र ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने…..
सर्व सदभक्तांना कळविण्यात मोठा आनंद होत आहे की अनेक दिवसांपासून चर्चेत आणि प्रयत्नात असलेले ‘श्री संत योगिराज निवृत्तिनाथ महाराज यांचे लीला चरित्र प्रकाशनानंतर येत्या आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशी, शके १९४५, दिनांक २९ जून २०२३ रोज गुरूवारी वाचकांसाठी विक्रीस उपलब्ध होत आहे.
संत योगिराज निवृत्तिनाथ महाराज पेंडूतीर्थ यांचे समग्र लीला चमत्कार आणि नाथांचे दृष्टे विचार या दिव्य ग्रंथात समाविष्ट आहेत.
या ग्रंथाचे लेखक श्री बालाजी कदम हे अतिशय सुंदर आणि रसाळ भाषेत नाथांच्या अद्भूत लीला प्रकट करतात.
ग्रंथ हा सर्व आधारावर तावून सुलाखून निघालेला आहे.
आचार्य गोविंद देव गिरिजी कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (न्यास), अयोध्या उत्तर प्रदेश यांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य भारती तीर्थ महास्वामीजी श्री शारदापीठ श्रृंगेरी कर्नाटक यांचे आशीर्वचन या ग्रंथास लाभले आहे. तसेच ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर आणि ज्योतिर्विद्यावाचस्पती डॉ. उमेश गुरूजी सांगवीकर यांचे प्रशंसन या ग्रंथास मिळाले आहे.
या ग्रंथाच्या वाचनाने प्रत्येक वाचकास संत योगिराज निवृत्तिनाथ महाराज यांच्याबद्दल नितांत श्रद्धाभाव जागृत होईल हे नक्की. त्यातून आपल्यावर नाथ कृपा होईल हे निश्चित!
हा ग्रंथ आषाढ शुद्ध एकादशीला पेंडूतीर्थ येथे होणाऱ्या उत्सवात स्टॉलवर उपलब्ध होईल.
आपणास प्रत्यक्ष ग्रंथ हवा असल्यास खालील संपर्कावर उपलब्ध होईल.
संपर्क : ८३०८४७७४४७