सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

 

नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील पवन नगरात वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळा सुरू होऊनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वचजण हवालदिल झाले आहेत. पर्यावरणात होत असलेले प्रतिकूल बदल लक्षात घेता वृक्षारोपण आणि संवर्धनाची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. यासाठी साहित्यलेखन आणि कृतिशीलतेची सांगड घालून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने विविध वृक्षांचे वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली. यावेळी मंडळाचे सल्लागार ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, अंकुश पौळ, श्रीकांत सुंकेवार यांची उपस्थिती होती.

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य चळवळीस पोषक असणाऱ्या कार्यक्रमासह इतर अनेक उपक्रम राबविले जातात. त्यात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनास प्रथम प्राधान्य देण्यात येते. शहरातील पवन नगरात फळलिंबू, आवळा, केरळ, बेहडा, सप्तपर्णी अशा विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर पुढील वृक्षांच्या संवर्धनाचे दीर्घकालीन नियोजन करून जबाबदारी निश्चित करण्यात आली. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण करुन संवर्धन करावे यासाठी कृतिशील आराखडा तयार करण्यात आला आहे. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहर, जिल्हा परिसरात विविध ठिकाणी शेकडो वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे समन्वयक पांडुरंग कोकुलवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *