नांदेड – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील देगावचाळ स्थित प्रज्ञा करुणा विहारात २९ जुलै रोजी सकाळी ११ वा. यावर्षीच्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने ‘एक वही -एक पेन’ अभियानास प्रारंभ होणार असल्याची माहिती संयोजक सुभाष लोखंडे यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगांवकर, नांदेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, प्रमुख वक्ते डॉ. हेमंत कार्ले यांची उपस्थिती राहणार आहे तर प्रकाश येवले, चंद्रकांत सावळे, पी. एन. पडघणे, रमेश गोडबोले, डी. डी. भालेराव, प्रज्ञाधर ढवळे, नागराज कांबळे, वैभव मुनेश्वर, अनिता नरवाडे, अॅड. माया राजभोज यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारातून ‘एक वही- एक पेन’ या अभियानास मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माणिकराव हिंगोले, कमलेश रणवीर, नामदेव दीपके, सिद्धार्थ ढेपे, रंगनाथ कांबळे, अनिकेत नवघडे यांच्यासह रमामाता महिला मंडळाच्या निर्मला पंडित, सविता नांदेडकर, चौतरा चिंतोरे, आशा हटकर, रंजन वाळवंटे, गोदावरी लांडगे, शिल्पा लोखंडे, गिता दिपके, रमा सातोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.