नैसर्गिक टेक्नॉलॉजी..

एक गुंज सोनं म्हणजे नक्की काय ??
गुंज हे लाल रंगाचे बी असते.. दिसायला अतिशय आकर्षक असते आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बी चा आकार हा एकसारखा असतो .. इतर बियांचे आकार लहान मोठे असतात.. निसर्गाने केलेली ही नैसर्गिक सोय..गुंजेची बी विषारी असते आणि त्याचा थायरॉइड मधे उपयोग होतो..
खेड्यात पूर्वी दुपारचे १२ वाजले कसे कळायचं ??
आमच्या गावी पूर्वी स्वतःच्या सावलीवरुन वेळ ठरवली जायची.. तो अंदाज इतका अचूक असायचा कारण १२ वाजता सावली पायात येते..त्या वरुन दिवसभराची कॅल्क्युलेशंस असायची.. पूर्वी घटका मोजायचे.. घटकाभर थांब असे शब्द कानावर यायचे.
पूर्वी धान्य कसे मोजायचे ???
धान्य मोजण्यासाठी पायली , पासरी , मण वापरले जायचे ( मन नव्हे ) म्हणुन बाणातील ण आणि नळातील न फरक जाणुन घ्या..नाहीतर शब्दांचा अर्थ बदलतो.. बरेच जण मणावर राज्य करतात ( मनावर करा रे )..
आजीबाईचा बटवा म्हणजे काय ??
पोट दुखलं ओवा खा , दाढ दुखली की दाढेखाली लवंग धरा..कफ बाहेर पडत नाही तर अळशी म्हणजे जवस याचा काढा घ्या.. हिरड्या मजबूत राहायला हव्या असल्यास एरंडाच्या काडीने दात घासा..
मोहरी फोडणीत का ??
जवस आणि मोहरीत ओमेगा ३ फॅटी ॲसीड आहे essencial fats ..
पुजा सांगताना गुरुजी फुलाचा वास का घ्यायला सांगतात ??
फुलातील अरोमाने मेंदुला तजेला मिळतो..
पंचापृत का प्यायचे ??
दिवसभर शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी यात असतात..
गोमुत्र का प्यायचे ??
ॲंटी कॅंसर आहे.
प्रसाद का खायचा ?
सात्विक अन्न आपल्याला रागापासुन दुर ठेवतं.. अतिराग भीक माग सगळ्याना माहीत आहे.. अन्नावरच आपले विचार ठरतात..
केळीच्या पानावर का जेवायचे ??
त्यातुन निघणारं तेल हे शरीरासाठी उपयोगी आहे.
हजारो गोष्टी आहेत.. काही तुम्हाला माहीत असलेल्या जरुर शेअर करा..
तात्पर्य कायतर निसर्गाने घरातच अन्नातच आरोग्य दिलेलं आहे त्यामुळे त्याच्या विरूध्द जाऊन न वागता त्याच्या सोबत पुढे जाऊयात..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *