नांदेड : नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक २९ जून २०२३ रोजी लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणे व संघटन बांधणीच्या अनुषंघाने लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्हि.जी. डोईवाड, व लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष रावसाहेब दादा पवार,बी.एम.गोणारकर व अॅड.दत्तराज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे
तरी नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी समाज बांधवानी व लोकस्वराज्य आंदोलन पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी १:०० वाजता हजर राहावे असे आवाहन लोकस्वराज्य आंदोलन युवक आघाडीचे मराठवाडा संघटक संतोष तेलंग,सचिन वाघमारे,नागोराव कुडके,बाळासाहेब टिकेकर,माणिक कांबळे,धोंडोपंत बनसोडे,अंकुश गायकवाड,संभाजीराजे वाघमारे,संदिप मेटकर,कैलास सुर्यवंशी,गंगाधर सिंधलोन,यादव कुडकेकर,आदी पदाधिकाऱ्यांच्या
वतीने आवाहन केले आहे.