डाऊन सरवरच्या कचाट्यात सापडले शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण पत्र! शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीने विद्यार्थ्यां सह पालक झाले हतबल ..

 

कंधार:/मो सिकंदर

सध्या महाराष्ट्रभर ” शासन आपल्या दारी ” ही योजना अर्जदारांचे प्रकरण ताबडतोब निकाली निघाले पाहिजे या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्च करून राबवली जात आहे. प्रत्यक्षात तहसील कार्यालयातील कर्मचारी हे प्रमाणिकपणे जरी काम करत असले तरी प्रत्यक्षात मात्र महा आयटीच्या महा ऑनलाईन प्रनालीचा नेटवर्क सरवर डाउन राहात असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण कामासाठी लागणारे प्रमाणपत्र डाऊन सरवराच्या कचाट्यात सापडल्याने पालक आपल्या पाल्यांचा शैक्षणिक नुकसान होत की काय ? या चिंतेने हतबल होऊन तहसील कार्यालय ते सेतू सुविधा कंद्रावर चकरा मारतांना दिसुन येत आहे.तसेच बहुतांश प्रमाणपत्र एरर मुळे अडकत असल्याने अर्जदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने एरर मुळे अडकलेली प्रमाणपत्रे “रिअप्रुव” करुन त्याच दाखल केलेल्या कागदावरच प्रमाणपत्र देण्यात यावे अशीही मागणी पालकातून केली जात आहे.

 

त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि आर्थिक भुर्दंडा पासून वाचतील असे बोलले जात आहे.

दि २५ जुन २०२३ रविवार रोजी राज्याचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री व डजन भर लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी या कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी राजाचे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या सोयी – सुविधेसाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनकल्याणकारी उपक्रमे राबवली जात असल्याचे सांगितले.ही योजना जरी नागरिकांसाठी उपयुक्त असले तरी ती योजना मात्र कागदावरच आहे की काय ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे. शासनाची शासन आपल्या दारी ही योजना पूर्णतः अमलात आणण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी या कडे लक्ष देऊन सरवर डाऊन च्या कचाट्यात अडकलेले विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र मिळण्यासाठी महा ऑनलाईनचा नेट सरवर सुरळीत करतील काय असा प्रश्न जनसामान्यातुन केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *