माणसाचं आयुष्य..

मला वाटतं किवा माझ्या अभ्यास आणि निरीक्षणातुन मी हे लिहीणार आहे..
माणसाचं आयुष्य ( त्याच्या कर्मानुसार ) चार विभागात विभागलं गेलय..
पहिलं म्हणजे गरीबीत जन्म आणि संपूर्ण आयुष्य गरीबीतच..
दुसरं म्हणजे एकदम गरीबीत जन्म आणि पुढील आयुष्य एकदम सुखकर..( आनंदी )
तिसरं म्हणजे लहानपणापासून शेवटपर्यंत मध्यमवर्गीय ..(स्टेबल ) .. फार झिकझिक नाही.. फार स्वप्नं नाहीत..
आणि चौथं म्हणजे लहानपणापासूनच श्रीमंती..
प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे आणि सुंदरही आहे फक्त आपण आयुष्याकडे काय म्हणुन पहातो यावर आपण सुखी आहोत की नाही हे ठरतं..
मी माझ्या सुखी आयुष्याबदल लिहीणार आहे.. मी वरीलपैकी दुसऱ्या प्रकारात मोडते…म्हणजेच काय तर एकदम तळ किवा एलदम शिखर.. लहानपणी इनर्स सुध्दा फाटके आणि आता अंगावर प्लॅटीनम ,डायमंड.. लहानपणी दुसऱ्याचे कपडे किवा वह्यापुस्तके वापरली आणि आता पुस्तके आणि कपडे दान करते. इतक्या लहान गावात जन्म की सायकलवर कधी बसले हेही आठवत नाही आणि आता विमानाने अनेकदा जाऊन २० देश फिरले.. गावात नाटक करता करता नटसम्राट नाटकाचा विश्वविक्रम नावावर आहे..
मी दहावीत असताना पहिल्यांदा टीव्ही पाहिला आणि आता डायरेक्ट कोण होणार करोडपतीच्या सेटवर.तिथे जाऊन सचिनजीना ॲक्टींग करायला लावली… तिथे जाऊन पुन्हा धपकन खाली कारण आपल्याला काहीही झालं तरीही जमीनीवरच रहायचय हेच यामागे कारण असावं..लग्न फक्त ५००० रुपयात तेही अगदी छोट्या गावात आणि २५ वी ॲनीव्हरसरी मालदिव्जमधे दिमाखात.. एका दिवशी २० रुपये अकाउंटला होते आणि एका दिवशी २० लाख होते.. एके दिवशी १० रुपयाचं कानातलं घ्यायला दहा वेळा विचार केलाय आणि एके दिवशी २ तासात ५ लाखाचा डायमंड नेकलेस विकत घेउन दिमाखात घरी आले.. लहानपणी विश्वास ठेवणार नाही इतकी लाजरी बुजरी ( पाहुणे आले तरी मजघरात लपुन बसणारी ) आणि आता लैगिकतेवर लिहीते आणि बोलते..इतका बदल इतका आत्मविश्वास आला कुठुन?? तो आला अपमान आणि गरीबीतुन.. म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी..
५० शी च्या उंबरठ्यावर उभी असताना मी मधलं आयुष्य कधी पाहिलच नाही.. एकदम खाली आणि एकदम वर.. रोलरकोस्टरच म्हणु. खुप खडतर आणि खुप सुखद..
म्हणुन मी नेहमी म्हणते .. Life is beaitifull..
तुम्ही यातील कुठल्या प्रकारात मोडता ??
जरुर विचार करुन पहा.. आठवायला मज्जा येइल..जर
Everything is decided असं आहे तर मग आपल्या हातात काय आहे ?? तर फक्त आणि फक्त चांगलं वागणं.. म्हणून हार मानायची नाही आणि स्वतःला कमी तर अजिबात लेखायचं नाही.. कारण Life is beautifull..

सोनल गोडबोले
लेखिका ,,अभिनेत्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *