नांदेड ; प्रतिनिधी
ढोल ताशांच्या गजरात बम बम भोले चा गजर करत २१ व्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या ७१ यात्रेकरूंच्या पहिल्या जत्थाला शुभेच्छा देण्यासाठी
विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तसेच नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे नांदेड रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले.
शुक्रवार दि.३० जून रोजी सकाळी दहा वाजता यात्रेकरू काळे टी शर्ट व भगवी टोपी घालून परिधान करून स्टेशन वर आले. लंगर साहब गुरुद्वारा तर्फे बाबा सुबेकसिंघ यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार केला. यावेळी कामाजी सरोदे, सुरेश शर्मा,शिवा लोट,राजेशसिंह ठाकूर यांनी यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.यात्रे दरम्यान अन्नदान करणारे
सतीश सुगनचंदजी शर्मा,
डॉ. अजयसिंह ठाकूर ,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, प्रतिमा राजेंद्र चौधरी, मनोज शर्मा नागपूर,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड,सरदार कुलदीपसिंघ,ओमप्रकाश पाम्पटवार,सरदार जागीरसिंघ,सरदार प्रताप फौजदार,अशोक जायस्वाल ,स्नेहलता जायसवाल ,शेंदूरवाडकर व रावके,प्रदीप शुक्ला, अरुण लाठकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी देण्यात आल्या. सुरेश लोट यांनी आयुर्वेदिक औषधी दिल्या.क्षत्रिय राजपूत महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा ठाकूर यांनी मिनरल वॉटर ची व्यवस्था केली.१३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, दिल्ली, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी जेष्ठ पत्रकार विश्वनाथ देशमुख यांच्या सह भाजपा,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, लायन्स क्लब, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, शिवा संघटना, शिवसेना, अमरनाथ यात्री संघ, पतंजलीचे सदस्य मोठ्या प्रमाणात आले होते. संयोजक दिलीप ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले.
( छाया :धनंजय कुलकर्णी)