मुखेड: प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नागेंद्र मंदिर मुखेड येथील मंदिरास ४० लक्ष रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले असून हे काम पूर्ण होईपर्यंत मी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिले.
आज गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आमदार डॉ. तुषार राठोड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जोत्सना तुषार राठोड यांनी साडेदहाची आरती केली. त्यानंतर भक्तांना संबंधित करताना ते आ.राठोड बोलत होते. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड, कृऊबाचे सभापती एडवोकेट खुशालराव पाटील उमरदरीकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष वीरभद्र हिमगीरे, अशोक गझलवाड, चंद्रकांत गरुडकर, शंकरअण्णा पोतदार, राम पत्तेवार, किशोर चव्हाण, गोविंद घोगरे, शंतनू कोडगिरे, करण रोडगे, जगदीश बियाणी, अनिल जाजू, दिपक मुककावार, शारदाबाई हिमगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार डॉक्टर तुषार राठोड व मान्यवरांच्या हस्ते चाळीस लक्ष रुपयाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात केली. आमदार डॉ. तुषार राठोड पुढे म्हणाले की, यापूर्वी मी श्री स्वामी समर्थ मंदिरात दहा लक्ष रुपयाचा निधी दिला होता. हे सभामंडप माझ्या निधीतून उभारले गेले आहे, यानंतर चाळीस लक्ष रुपयाचा निधी दिलेला आहे संपूर्ण मंदिर उभारणीपर्यंत निधी कमी पडत असेल तर मी देण्यास तयार आहे, सदभक्तांनी काही काळजी करू नये असे आश्वासन दिले.
यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या रक्तदान शिबिराचेही त्यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमास भक्तांनी खूप मोठी गर्दी केलेली होती.
अनेक भाविकांनी गुरुपद घेतले. यावेळी विवाह नोंदणी, प्रश्न उत्तर, वास्तु दोष, गर्भसंस्कार असे अनेक स्टॉल उभारून दिवसभर विनामूल्य मार्गदर्शन केले गेले. आमदार डॉ.तुषार राठोड यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी भरीव निधी दिल्यामुळे भक्तगणात आनंदाचे वातावरण दिसून आले यावेळी शिवा सम्राळे, शिवा मुद्देवाड, प्रमोद यादव, पवन ठाकूर, गजानन गोरलावाड, काशिनाथ येवते, विनोद दंडलवाड, विलास कोडगिरे, अनिल पईतवार, अमोल मडगुलवार, वैजनाथ दमकोंडवार, गजानन कवटीकवारसह शिवेकरी, व भक्तगण पुरुष-महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ केंद्राकडून मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दादाराव आगलावे यांनी केले.