ज्याप्रमाणे रात्रीनंतर होणारा सूर्याेदय कुणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे कालमहिम्यानुसार होणारी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापनाही कुणी रोखू शकत नाही. हिंदु राष्ट्र येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अनेक संतांनीही त्याविषयी सांगून ठेवले आहे. काळही त्याच दिशेने जात आहे. त्यामुळे या काळात आपण जर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य केले, तर काळानुसार धर्मकार्य होऊन त्यातून आपली साधना होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याचा निश्चिय करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री.वैभव आफळे यांनी या वेळी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. नांदेड येथील अंबिका मंगल कार्यालय, काबरा नगर रिंग रोड याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच देशभरात 83 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी ‘प्रात्यक्षिकांचा लघुपट दाखवण्यात आला.’ या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष श्री.श्रीराज चक्रावार आणि महानगर मंत्री श्री.गणेश कोकूलवार ,राम जन्मोत्सव समितीचे श्री.गणेश सिंह ठाकूर, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पांडे, प्रसिद्ध उद्योजक श्री. नारायण कलंत्री, श्री अन्नपूर्णा देवी मंदिराच्या विश्वस्त सौ.सुषमा गहेरवार आदी मान्यवर तसेच २८० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
4 भाषेत‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’:
यंदाच्या वर्षी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदी, बंगाली, ओडिया आणि गुजराती या 4 भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.
आपली नम्र,
कु.प्रियांका लोणे,
हिंदु जनजागृती समिती (संपर्क : ८२०८४४३४०१ )