कंधार ; प्रतिनिधी
भाई केशवराव धोंडगे यांच्या शतक महोत्सव कार्यक्रम भव्यदिव्य घेण्यात येणार होता परंतु 1 जानेवारी रोजी दुःखद निधन झाले.भाई केशवराव धोंडगे यांनी गोरगरीबांच्या विद्यार्थीना शिक्षण घेता यावे यासाठी मोठ्या कष्टाने श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.याच संस्थेतुन अनेक विद्यार्थी घडवले.4जुलै रोजी त्यांचा जन्म दिवस आहे परंतु त्यांचे दुःख निधन झाले असल्याने या वर्षी 102वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्साह निर्माण झाला पाहिजे या उद्देशाने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व साखरतुला करुन त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दिवंगत भाई केशवराव धोंडगे यांच्या 102 व्या जयंती च्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. मुक्तेश्वरराव धोंडगे हे होते तर प्रमुख व्यक्ते मा.डॉ.शिवाजीराव शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, स्त्री रोग तज्ञ, माऊली हॉस्पिटल, नांदेड)प्रमुख पाहुणे प्रा.लिलाताई राजेश्वरराव आंबटवाड(अध्यक्षा, शालेय समिती, श्री शिवाजी मा.व.उ.मा. विद्यालय, कंधार)
तर प्रमुख उपस्थिती शहाजी नळगे (मा नगरसेवक )
मा.मन्नान चौधरी (नगरसेवक, न.प. कंधार) जफरोद्दीन बाहोद्दिन (माजी. नगराध्यक्ष, न.प.कंधार),मा. अँड.जे.टी. लाडेकर ,(माजी अध्यक्ष श्री शि.मो. एज्यू. सो. कंधार)श्री रामराव पवार (माजी नगराध्यक्ष, न.प. कंधार) मोहम्मद अजीमुद्दीन सरपंच कोटबाजार, पाशा भाई उपसरपंच या मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
दिनांक4.07.2023 रोजी माजी आमदार व खासदार दिवंगत डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या १०२ वा जयंती सोहळ्याच्या निमित्ताने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये 07 गुणवंत विद्यार्थी 1)शगुफ्ता बेगम शेर जिलानी (12 वीं कला), 2) अस्ना मो. अझगर सरवरी (12 विज्ञान ) उर्दु माध्यम, 3) मोरताडे अर्पिता लक्ष्मण (12वीं विज्ञान) 4) वरपाडे अनुजा रामराव (12 कला ) 5)) सारडा आयुष बजरंग (12कॉमर्स ) बारोळे वैष्णवी सुधाकर( 10 वा)आमेना बेगम मिर्झा हिदायत बेग (10 वा ) साखरतुला करण्यात आली .
या कार्यक्रम ला यशवी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सदाशिव आंबटवाड,श्री बी.डी. जाधव (उप मु.अ.) श्री रमाकांत बडे (पर्यवेक्षक)
श्री संभाजी वडजे(उपप्राचार्य)
सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले . या वेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ची मोठे संख्या ने उपस्थिति होती