मन्याड खोर्‍यातील क्रांतिपुरुष म्हणजेच डाॅ.भाई मुक्ताईसुत धोंडगे!–स्वातंत्र्य सेनानी माजी नगराध्यक्ष रामराव पवार

कंधार ;
कंधार तालूका म्हटले की मन्याड खोरे अन् डाॅ.भाई धोंडगे यांची सत्याग्रहातून चळवळ हे अवघ्या महाराष्ट्रात सुपरिचित आहे.कंधार म्हणताच ओळख डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या मानवता धर्म जपणारे कार्य अठरापगड समाजाच्या उन्नतीसाठी आपला देह चंदनासम झिजवून आपले शतकिय आयुष्य ढाण्या वाघ सारखे जगून मृत्यूलाही त्यांनी कार्यकतृत्वाने अजरामर करणारे अवलिया व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांची १०२ जयंती कंधार शहरातील मुक्ताई नगरीच्या छ.शिवरायांच्या चौकात साजरी करतांना प्रमुख अतिथी आपले मन्याड खोर्‍यातील फर्डे वक्ते,निर्भीड व्यक्तीमत्व,
जयक्रांतिचे संपादक, लेखनी बहाद्दर पत्रकार, ग्रामीण भाषाप्रभु, नवनविन शब्दांचे निर्माते,
डोंगर दर्यातील दगड-गोटाळांना निडरपणा शिकविणारे, न्यायासाठी लढत राहावे कसे?यांचे जुणकांही प्रॅक्टीकल करण्यासाठी भाग पाडणारे महाराष्ट्र विधानसभेत व देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरात (संसदेत) सत्ताधिशांना बुध्दीमत्तेच्या जोरावर घामफोडणारे व्यक्तीमत्वाची जयंती साजरी करण्यात आली.

 

या प्रसंगी कार्यक्रम वंदेमातरम गीतानंतर ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना व दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांना आदरांजली अर्पण करुन सुरुवात केली.प्रमुख पाहूणे कंधारचे माजी नगराध्यक्ष व स्वातंत्र सैनिक आदरणीय रामराव पवार साहेब हे ज्येष्ठ व्यक्तीमत्व तीनचाकी रिक्षा करुन भर पावसात आपली हजेरी लावताच आम्ही उपस्थित थक्क झालोत.त्यांनी आपले मौलीक विचार मांडतांना म्हणाले.मला घरी राहावे असे वाटले नाही.त्यांचे आपण एका क्रांतिकारकाच्या जयंतीस जात आहोत तेंव्हा कितीही अडचणी आल्यास जयंती साजरी करण्यास जायचेच!या ठाम निश्चयाने मी येथे आलो.

 

मन्याड खोर्‍यात जतीयतेला, मानपानाला,अन्याला,अंधश्रद्धेला,अज्ञानाला,वशीलेबाजीला,शिफारस अलीला पाताळात दडपण्यासाठी अहोरात्र कार्य करुन आपले आयुष्यच खर्चिले!एक तत्व,एक पक्ष,एक झेंडा,एक विचार बाळगत देशभक्ती,राष्ट्रभक्ती, गुराखीराजाची भक्ती करत आपले जीवन वाघासारखे जगले.म्हणून त्यांच्या कार्यचा गौरव केला.अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही जयंतीचा कार्यक्रम नारायणराव पटणे सर यांच्या निवासस्थानी साजरा केला या प्रसंगी माजी लिपिक नारायणराव पटणे फुलवळकर,पतंजली योग समिती कंधारचे प्रभारी,ऑनलाईन योग शिक्षक नीळकंठराव मोरे सर
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक माधवराव मुसळे सर, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक उध्दवराव मोरे सर,सहशिक्षक मारोतराव केंद्रे सर, संगमेश्वर राठोड, शिवराज सर केंद्रे,कोंडावार सर,गोपाळसुत दत्तात्रय एमेकर सर,अल्टो चालक आदी उपस्थित होते.आभार प्रदर्शन नारायणराव पटणे सर यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *