सगळ्याच बायका व्हीलन कशा ??..
मला सतत अनेक प्रश्न पडतात ,त्यापैकी हा एक प्रश्न कायम सतावतो आणि नवरा बायको दोघांचीही किव करावी वाटते..
माझे जवळपास ९०% मित्र हे बायकोला व्हीलन समजतात.. तिला मैत्रीण आवडत नाही , त्यामुळे आम्ही खोटं बोलुन येतो असा त्यांचा सुर असतो.. पण लग्नाच्या आधीच किवा लहानपणापासूनच मुलानी घरात किवा आजूबाजूला जे पाहिलेलं असतं तसं ते वागतात.. घरात आई समोर बाबाचं काहीही चालत नाही. बाबाने इतर पुरुषांशी बोललेलं आवडत नाही किवा त्यांची भांडणं ,संशय घेणं या सगळ्या गोष्टीचा परिणाम मुलांच्या वैवाहिक आयुष्यावर होतो.. नवरा बायको हे व्हीलन नसुन मित्र आहेत ही भावना प्रत्येक मुलाच्या मनात रुजायला हवी असेल तर आईबाबाचं नातं हे उत्तमच असायला हवं.. मुलांना चांगलं वाईट कळत नाही ते फक्त अनुकरण करतात.. पुढे जाऊन मुलगीही तिच्या नवऱ्याकडे संशयानेच पहाते.
या स्त्रीयाचं तर खरच काही कळत नाही.. स्वतःही आनंदी रहात नाही आणि नवऱ्यालाही आनंदी ठेवत नाही.. त्याचे फोन चेक कर , तो कोणाशी बोलतो हे बघ , इतकं सगळं करूनही तो लफडी करतोच.. मग आपला मौल्यवान वेळ आपण का वाया घालवतो.?? . थोडा विश्वास ठेवा , थोडी स्पेस द्या , एकमेकांशी बोला.. जे आपलं आहे तितकच आपल्याला मिळणार तर मग हा नियम नात्यामधे का नसावा ?? .. थोडं प्रेम कुठे शेअर होत असेल तर एवढा आकांडतांडव करण्यासारखं काय आहे ??… उत्तम संसार असायला खुप गोष्टी लागतात फक्त शारीरिक गरजा नाहीत आणि एक व्यक्ती सगळ्या गोष्टी देउ शकत नाही मग ही व्हीलनगीरी का ??
प्रत्येकाने आपला संसार उत्तम सांभाळावा हे पुरेसं नाही का ??,, पुरुषांसोबत बाहेर असते ती स्त्रीच ना ??मग तरीही ??..
माझ्या आयुष्यात घडलेला एक रीअल किस्सा सांगते.. सगळ्याना माहीत आहे मला पुरूष आवडतात त्यामुळे माझे पुरुष मित्र जास्त आहेत.. माझ्या मित्राची बायको त्याला म्हणाली ,,तु सोनल सोबत बोलायचं नाहीस ,त्याने तिच्यासमोर माझा नंबर डीलीट केला आणि ऑफीसला आल्यावर माझ्याकडून मेसेंजवर पुन्हा नंबर मागुन घेउन सगळी स्टोरी सांगितली..त्याला म्हटलं ,अरे तु नको मला फोन करु,त्यावर तो म्हणाला , तिचं ऐकुन आपली चांगली मैत्री का तोडु ?? मी नंबर सेव्ह करणार नाही… त्याला म्हटलं, तुझं तु बघ. तिच्या आरडाओरडा करण्याला काहीतरी अर्थ होता का ??.. माझ्यासारखी स्त्री लोकांचे संसार वाचवायला मदत करते ती असल्या गोष्टी करेल का ?? इतकी साधी गोष्ट तिला समजु नये यासरखं दुर्भाग्य ते काय..
बरेच पुरूष बायकोला व्हीलन करुन आपली पोळी भाजुन घेतात.. हा अनुभव मी सुध्दा घेतला आहे.. प्रत्यक्षात वेगळं असतं आणि भासवलं वेगळं जातं…
Men will men .. त्यामुळे व्हीलन होवुन त्याला हातळण्यापेक्षा मित्र म्हणुन त्याला सांभाळा आणि बदल पहा..
सोच बदलो.. देश बदलेगा..
सोनल गोडबोले