कंधार :- हानमंत मुसळे
तालुक्यातील ग्रा.प. मानसिंगवाडी अंतर्गत चोळीतांडा, लिंबा तांडा, राठोडनगर येथे केलेल्या जलजिवन मशिन पा.पु व म.ग्रा.रो.ह.यो. जि.प. ग्रा.पा.पु. उन्हाळी टंचाई पुरक व 15 वित्त आयोगातुन तसेच लोकं प्रतिनिधीच्या फंडातुन व विविध योजनेच्या विकास कामे करण्यात आली आहे. जलजिवन मशिन पा.पु योजनाची लिंबा तांडा व राठोडनगर या दोन्ही गावाचे स्वतंत्र पा.पु. योजना करिता लोकसहभागातुन सौ.सुरेखा संजय राठोड (ग्रा.प.सदस्य) याचे पती संजय किशन राठोड यांनी 1,56,000/- रु. व सुनिल राठोड यांच्या हस्ते 1,20,000/- रु. ग्रामसेवक व सरपंच यांना नगदी स्वरुपात देण्यात आले होते.
सदरिल मंजूर योजनेचे काम स्वतंत्र केली नसल्यामुळे दोन्ही गावाची लोकवर्गी गावातील नागरिक परत मागत आहेत. सदरिल योजनेचे बोगस काम असल्यामुळे वारंवार वरिष्ठाकडे तक्रारी केल्या त्यामध्ये सार्वजनिक पा.पु. विहीर, टाकी, बोरवेल, हातपंप, मोटार, पाईप लाईन केलेल्या कामाची तसेच जि.प. नांदेड ग्रा.प. पा.पु. विभाग मार्फत पाणी टंचाई पुरक आदि कामच न करता बोगस बिल तयार करुन सरपंच व ग्रामसेवक, एजन्सी कंञाटदार, गावातील मध्यस्ती दलाल यांच्या संगनमताने व सत्ता, दादागिरी, पैश्याच्या जोरावर मनमानी करुन कसल्याच प्रकारचे काम न करता बोगस M.B. व C.C. बिल तयार करुन सदरिल रक्कम पा.पु.एजन्सीच्या नावाने हडप केलेली आहे.
सदरिल ग्रामसेवक, सरपंच , जि.प.पा.पु. उपविभागाचे शाखा अभियंता पा.पु.एजन्सी, संबंधित कंञाटदार यानी केलेल्या कामाची तात्काळ चौकशी करुन आपल्या कार्यालया मार्फत दोषी विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे अश्या मागण्या घेऊन मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संजय किशन राठोड (काँम्रेट कार्यकर्ता), सुनिल राठोड, रविंद्र राठोड, अरुण राठोड, एकनाथ पवार व इतर गावातील नागरिक अमरण उपोषणास बसले होते.
सदरिल कामाची चौकशी करिता मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये जि.प.पा.पु. च्या शिफारशीनुसार दि ४ जुलै रोजी उपविभाग पा.पु. कंधार बलराम शिंदे यांनी मागण्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.