पेठवडजची नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती तात्पुरती स्थगित

 

नांदेड : जिल्ह्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंधार तालुक्यातील पेठवडज येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची स्थापना ही नियमबाह्य पद्धतीने तसेच शासन निर्णयाला डावलून स्थापन करण्यात आली आहे समितीची स्थापना करताना 50% महिलांची उपस्थिती आवश्यक असताना एकही महिला उपस्थित नव्हती तसेच पूर्व सूचना न देता घाईगडबडीने समिती स्थापन करण्यात आली आहे. सदरील प्रकरणी समिती स्थापनेची चौकशी सुरू करून चौकशी पूर्ण होईपर्यंत या समितीस तुर्तास स्थगित करावे अशी मागणी पेठवडज येथील अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य नारायण काळबा गायकवाड यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे केली होती.
त्याच अनुषंगाने सदरील प्रकरणी सद्यस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित असेल अशा आशयाचे लेखी पत्रच शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संबंधितांना दिले आहे. या प्रकरणी सदर बाबतीत 8 दिवसात आपण चौकशी करून प्रस्तुत कार्यालयास वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. चौकशी पूर्ण होऊन पुढील निर्देश या कार्यालयाकडून प्राप्त होईपर्यंत समितीच्या संदर्भातील सर्व कार्यवाही तूर्त स्थगित ठेवावी. असेही पत्रात नमूद केले आहे. याबद्दल पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *