काल आम्ही काही फ्रेंड्स हडशी (पुणे ) ला गेलो होतो.. हडशी हे खूप उंचीवर आहे आणि चारही बाजूने डोंगरानी वेढलेले आहे.. सत्य साईबाबांचं मंदीर आणि साईबाबांची उंच मोठी मूर्ती आहे.. बोटींग आहे.. प्रचंड मोठा परिसर आहे .. कुठल्याही सिझनमधे तिथे स्वित्झर्लंडला गेल्याचा फील येतो..
खुप पाऊस , खुप वारं , थंडी , धुकं त्यामुळे सॉलीड रोमॅन्टिक फील येतो.. सगळ्या सीझनला मला तिथे जायला आवडतं..
कालही तिथे प्रचंड वारं आणि पाऊस होता..Actually we were shivering.. शब्दातीत करु शकत नाही इतकं ते रमणीय आणि स्पृहणीय होतं.. तिथे गेल्यावर मित्रांना भजी खायची हुक्की आली.. त्यानुसार भजी प्लेट समोर आल्यावर आमच्यातील एक कवी मित्र सुटलाच.. काय नशीबवान ही भजी … ही आता सोनलच्या त्या गोड दाताखाली जाणार आणि आम्ही पहात बसणार.. नशीब असावं तर त्या भज्यांचं..तिच्या हातात ते भजं पाहुन माझं हृदय भजभजं होतय.. कधीतरी त्या हातात आमचाही हात असेल अशी आशा समस्त पुरूष वर्ग करतोय.. असा काही तो बरळत होता की मला रील करायचा मोह आवरला नाही.. ती तळलेली मिरची सुध्दा त्यावेळी खूप गोड लागत होती कारण असले कवी मित्र सोबत होते..
पण ते रील पाहुन माझे वाचक आणि चाहते हैराण झाले.. इनबॉक्समधे मेसेजेस पाहिल्यावर , मीच कपाळाला हात लावला..आणि भेज्याची भजी झाली.. मेसेजेस असे होते.. मॅम डाएट चं काय ??
तुम्ही जाड व्हाल .. आम्हाला आवडणार नाही..
मॅम पोट वाढेल.. आम्ही तुम्हाला फॉलो करतो..
पण त्यात एक स्त्रीचा मेसेज होता जो विशेष भावला .. तिने लिहीलं होतं , तुम्हाला पाहुन मी ३ किलो वजन कमी केलय नका ना तुम्ही भजी खाऊ…prerana Yu r sweet… Thankuu ..अजून कमी करा..
मित्रांनो.. ती भज्याची प्लेट व्हीडीओसाठी होती.. मी वर्षातुन एकदा एक भजी खाते , वर्षातुन २ वेळा आईस्क्रीम खाते चहा तर कधीच पित नाही..कॉफीचे कधीतरी दोन घोट आणि वाईन ग्लास हातात फोटोसाठी असतो …काळजी करु नका.. मी प्रचंड हेल्थ कॉंशस आहे.. तुम्ही माझ्यावर प्रेम करताय अजुन काय हवय..
एक ते भजं बिचारं त्यावर किती ती चर्चा.. जरा खाऊदेत रे या जीवाला.. तुम्ही आनंद घ्या आणि मलाही घेउ द्या.. पण भजी खाताना जरा जपूनच बरं का… कारण या दिवसात शरीरात वात वाढतो ..
सोनल गोडबोले