नांदेड ;
दि 2 सप्टेंबर रोजी भारतीय सैन्यात 32 वर्षे 7 महिने सेवा पूर्ण करून परत मायभूमी परतणारे रिटायर्ड सुभेदार मेजर / ऑर्डीणरी कॅप्टर संजयराव कदम साहेब यांच्या स्वागतासाठी नांदेड रेल्वे स्टेशन वर वीर सैनिक ग्रुप च्या वतीने ग्रुप ची ट्रॉफी, शॉल , हार देऊन व जय्यत रॅलीने सत्कार ठेवण्यात आला होता त्यांच्या स्वागतासाठी सुट्टीवर असलेले सैनिक , माजी सैनिक , व वीर सैनिक ग्रुप चे समस्त सदस्य उपस्थित होते ,.
वीर सैनिक ग्रुप इथून पुढे जो कुणी सैनिक सेवानिवृत्त होऊन परत मायभूमी येईल त्यांचा अशाच पद्धतीने सत्कार समारंभ ठेवेल असे सुभेदार शाम कस्तुरे व प्रविण देवडे यांचे म्हणणे आहे ,
एखादा सैनिक आपली सेवा संपवून मायदेशी परततो तेव्हा त्याला कुणीही विचारत नाही जो सैनिक शहीद होतो त्यांना मान सन्मान मिळतोच परंतु जे सैनिक आपली सेवा पूर्ण करून मायभूमी परत येतात ते सुद्धा देशासाठी सर्वस्व पणाला लावतात , जे सैनिक शहीद होतात त्यांचा त्यानां जो मान सन्मान मिळतोच पण जिवंत पणी सुद्धा प्रत्येक सैनिकाला आपापल्या शहरामध्ये मान सन्मान मिळायला हवा ,
वीर सैनिक ग्रुप ने सुरू केलेली ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहील व सैनिकांना त्यांचा तो मान सन्मान त्यांच्या उपस्थिती मध्ये सुद्धा देण्यात येईल,
या प्रसंगी उपस्थित माजी सैनिक व मंडळ अधिकारी यच जी पठाण , सैनिक व्यंकटेश पाटील , सैनिक हरिभाऊ करांडे , सैनिक मुंजाजी, सैनिक सुरेश केंद्रे, सैनिक गणेश ठाकूर , सैनिक पत्नी व भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्षा पठाण मॅडम , जयेश भरणे , अर्जुन नागेश्वर , बलबीर सिंग, प्रदीप टाक , विनय मंतुरी , रोहित ढगे, स्वप्नील मेरगु,नरसिंग मुरकुटे , प्रथमेश व वीर सैनिक ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.