नांदेड : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने मराठवाड्याचे भाग्यविधाते भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकराजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त Yonex sunrise महाराष्ट्र पहिली सीनियर राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेस 21 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
यशवंत महाविद्यालय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे स्पर्धेचे आयोजन केले आहे .माननीय आमदार श्री मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री, नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष श्री डी.पी सावंत राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय महेश कुमार डोईफोडे म.न.पा. आयुक्त , महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव जीवन गौरव पुरस्कार व दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्रीकांत वाड, माननीय संजय गाढवे जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री विश्वास देशवांडीकर मुख्य पंच, हे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत 432 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त बॅडमिंटन प्रेमींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री डी.पी.सावंत यांनी केले आहे या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून विश्वास देशवांडीकर हे राहणार आहेत .
या स्पर्धेत महराष्ट्रातील नामंकित खेळाडू वरून कपूर , आर्या भुपत्की, पूर्वा बर्वे, श्रुती मुंदडा, शुभम डे, साद धर्माधिकारी , निकिता जोशेफ, सोनाली मिरखेलकर, रितिका ठक्कर, सिमरन सिंगी या मानांकित खेळाडूंचा सहभाग असणार आहे
अशी माहिती जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव महेश वाकरडकर यांनी दिली आहे .