उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा… प्रवीण पाटील चिखलीकर

 

कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टीने कंधार ने सेवा दिन म्हणून साजरा केला एक हात मदतीचा या माध्यमातून अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २२ रोजी कंधार तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी लोहा कंधार विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते वृक्षारोपण, प्राणवायू निर्मिती उद्यान, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले दि २२ रोजी सकाळी नऊ वाजता बामणी आलेगाव येथील डोंगरावर प्राणवायू निर्मिती उद्यान उद्यान विकसित करण्याच्या दृष्टीने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला त्यातील पहिल्या टप्प्यात २०० झाडे लावण्यात आली ,आगळा वेगळा उपक्रम मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला तसेच कंधार लोहा तालुक्यातील दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ही वाटप करण्यात आले यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर बोलताना म्हणाले की समाजाचा दुर्लक्षित घटक म्हणून दिव्यांगा कडे पाहिले जाते परंतु ते सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहे जेवढे आपण आहेत त्यांच्याकडे सहानुभूतीच्या नजरेने न पाहता तेही आपल्या समाजातील आपल्या परिवारातील प्रमुख घटक आहेत हे लक्षात ठेवूनच त्यांच्यासाठी आपण सर्व मिळून कार्य करावे जेणेकरून ते मुख्य प्रवाहात येतील असे ते यावेळी म्हणाले .
यावेळी प्रणिताताई देवरे चिखलीकर बोलताना म्हणाले की करोणा काळामध्ये प्राणवायूचे महत्त्व लक्षात आले , प्राणवायू जास्ती ची निर्मिती करणारे झाडे आपण मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजे व निसर्गाचा होणारा र्हास , बिघडणारे समतोल हे मूळ स्थितीत राहण्याकरिता आपण सर्वजण मिळून वृक्ष लागवडीचा संकल्प केल्यास येणाऱ्या पिढीस मुबलक व स्वच्छ प्राणवायू मिळू शकेल असे ते यावेळी म्हणाले यावेळी याकंधार शहरातील छत्रपती शाहू महाराज निवासी मतिमंद विद्यालय कंधार ,संजीवनी निवासीअपंग विद्यालय कंधार व या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच ग्रो अँड ग्लो इंग्लिश स्कूल कंधार येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे लोहा कंधार विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर ,महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारी सदस्य
प्रणिताताई देवरे चिखलीकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा
चित्ररेखाताई गोरे, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड ,भाजपचे लोहा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील,
भाजप शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, शिक्षका आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, महिला मोर्चाच्या कल्पनाताई गीते ,गोरे ताई, युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष निलेश गौर,शहर सरचिटणीस मधुकर डांगे, चेतन केंद्रे, शंतनू कैलासे ,वेंकट नागलवाड ,किशनराव गीते, प्रदीप मंगनाळे ,बालाजी तोरणे,कैलास नवघरे, नवनाथ आईतवाड, बालाजी तोटावाड ,प्रकाश घोरबाड, आसिफ शेख, सुनील कांबळे, सागर डोंगरजकर, कैलास नवघरे,आदी उपस्थित होते

प्राणवायू निर्मिती उद्यान च्या पहिल्या टप्प्यात 200 वृक्षाची लागवड….प्रणिता देवरे चिखलीकर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने सेवा दिन, एक हात मदतीचा हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला त्यानिमित्त बामणी तालुका कंधार येथे प्राणवायू निर्मिती उद्यान ऑक्सिजन पार्क अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी पहिल्या टप्प्यात दोनशे वृक्ष लागवड करण्यात आली या वृक्ष लागवडीस लोहा कंधार विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणिता ताई देवरे चिखलीकर, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव नाईक, भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड, लोह्याचे तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील, प्रकाश तोटावाड, मधुकर पाय, साईनाथ कपाळे ,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, सुरेश बासटे निलेश गौर,साईनाथ कोळगिरे , मधुकर डांगे, विभागीय वन अधिकारी सागर हराळ ,वनपाल शिवसंभा घोडके, वनपाल जाधव, वनपाल शंकर धोंडगे, वनरक्षक खयूर शेख, वनरक्षक परमेश्वर टेकाळे ,वनरक्षक शेख महबूब, वनरक्षक दादा बरे ,वनरक्षक शिवनंदा नागरगोजे यांच्यासह आलेगाव
मंगलसांगवी, भुताचीवाडी, दाताळा ,उस्माननगर ,शिराढोण, नंदनवन, बामणी, लाट खु ,लाडका ,दिंडा, बिंडा गुंडा या भागातील सरपंच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये वन वृक्ष लागवड करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *