विजेचा शॉक लागून मृत्यू पावलेल्या ईश्वर डावकरे यांच्या नातेवाईकास पत्रकार संघाच्या वतीने 50 हजाराची मदत

मुखेड:
तालुक्यातील वर्ताळा येथील रहिवाशी ईश्वर ज्ञानोबा डावकरे यास विद्युत वितरण कंपनीच्या डायरेक्ट थ्री फेज लाईटचा शॉक लागून जांब (बु.) येते तो जागीच मृत्यू पावला. त्यांच्या नातेवाईकास मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पन्नास हजार रुपयाचा धनादेश देण्यात आली.
तालुक्यातील वर्ताळा येथील रहिवासी इश्वरे डावकरे हा जांब (बु.) येथे बाजारासाठी गेला असता विद्युत वितरण कंपनीचे थ्री फेज तार अत्यंत खाली असल्याने नजर चुकीने ताराचा धक्का लागून त्याला जोराचा शॉक लागून तो जागीच ठार झाला. विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने सदरील इसमाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. माणुसकीच्या नात्याने मुखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पत्रकार संघाचे संघटक एडवोकेट संदीप कामशेट्टे यांच्या पुढाकारातून पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्नास हजार रुपयाचा धनादेश देऊन माणुसकीच्या नात्याने सहानुभूती दाखवण्यात आली पत्रकार संघाच्या या कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, पत्रकार विजय पांपटवार, दादाराव आगलावे, ज्ञानेश्वर डोईजड, किशोर चौहाण, मेहताब शेख, नामदेव श्रीमंगले, रमेश डावकरे, किशनराव आगलावे, संभाजी डावकरे, भगवान डावकरे, परमेश्वर डावकरे, तुकाराम डावकरे, माणिक डूमणे, भास्कर आगलावे, अंगद आगलावे, सुरेश कदम, चंद्रहंस डावकरे, सुभाष जायेभाये, माधव अटकळे, अक्षय वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *