भारतात पुर्वी पासुन प्रत्येकांच्या घरी लहान बाळासाठी लाकडी असो वा लोखंडी पाळण्याच्या वर बाळाला खेळण्यासाठी कृत्रिम चिमण्या,प्लास्टिक पुंगळया व रंगीन कापडाच्या तुकड्याने।। चांदवा ।।करुन
बाळास खेळण्यास लावतात सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी सृजनशीलतेतून शिल्प निर्माण केले.हे शिल्प पाहून माझे प्रेरणास्त्रोत दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी या मातृशिल्पाचे कौतुक करतांना माझी “शर्करातुला” करुन माझ्या कल्पकतेला सन्माननीत केले आहे.
।मानव आपल्या बाळासाठी “चांदवा” त्याची आई स्वतः बनविते।पण————–पक्ष्यांच्या पिलांसाठी “चांदवा”तयार कसे जमणार?म्हणुन पक्ष्यांच्या घरट्यावर चांदवा लावण्याची कल्पना सुचली।
मानवा तुझ्या पिलांना चांदवा,
पक्ष्याच्या पिलांना का नाही?
असा प्रश्न विचारुन बिचाऱ्या पक्ष्यांच्या पिलांच्या घरट्यावर पिंपळ वृक्षाचे पान व त्याला निलगीरी वृक्षाच्या घंट्यासम फळं लावून ।।चांदवा।। तयार करुन घरट्यात असलेल्या पिलांना खेळण्यासाठी लावुन वेगळी कल्पकता अवतरली।हे ।।मातृशिल्प।।तयार झाले।।सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार