दुसऱ्यांच्या दुःखात आनंद पेरणारा हास्य कलावंत गजानन गिरी..!

 

जीवन जगत असताना अनेक चेहरे पाहायला मिळाले, ती वाचायला मिळाली ती अनुभवायला सुद्धा मिळाली, माणसाचं जीवन जरी एकदा असलं तरी त्या जीवनामध्ये आहे त्या वेळेमध्ये आपण भरपूर काही करू शकतो. मग ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्यासाठी जिव्हाळ्याची माणसं आपल्याला निर्माण करावी लागतात. जिव्हाळ्याची माणसं निर्माण करण्यासाठी आपल्याला अगोदर त्यांच्यासोबत निस्वार्थ भावनेने आपली मैत्री घट्ट करावी लागते.

अशाच एका निस्वार्थ व्यक्तिमत्त्वासोबत माझी मैत्री एकदम घट्ट झाली. त्याचं कारण मी निस्वार्थ भावनेने त्यांच्यासोबत निभावलेली मैत्री ही, माझ्या आज कामाला आली. खरं पाहता तर ती व्यक्ती कोण असेल? असं तुमच्या मनाला वाटत असेल, तर ते दुसरं तिसरं कोणी नसून आपल्याच नांदेड जिल्ह्याचेच भूमिपुत्र ज्यांची ओळख जगभरात हास्यसम्राट म्हणून घेतली जाते. ते म्हणजे माझे जिवलग मित्र, सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत आदरणीय गजानन किशन गिरी. आता यांचे नाव ऐकून तुम्हाला सुद्धा वाटला असेल की, आम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांना अनेकदा ऐकलो, पाहिलो त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गुंजनताई गिरी यांची सुद्धा त्यांना खूप मोलाची साथ मिळते. आज सामाजिक जीवन जगत असताना माणसांनी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं, परंतु स्वतःबरोबर आपण समाजाला काय देतो याचा सुद्धा कुठेतरी विचार करता आला पाहिजे. असाच विचार करणारे गजानन गिरी यांना अनेक वर्षापासून मी पाहत आलो.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टिक टॉक’ पासून ते आज ते सर्वांना परिचित असलेले सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत गजानन गिरी यांचा जन्म २७ जुलै १९९४ रोजी नांदेड येथे झाला. गजानन गिरी यांचे प्राथमिक शिक्षण सुधाकरराव नाईक विद्यालय नांदेड येथे पहिली ते सातवीपर्यंत झालं. आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण संजय गांधी विद्यालय नांदेड येथे झालं. पुन्हा अकरावी आणि बारावी यशवंत कॉलेज नांदेड येथे झालं. त्यानंतर इंजिनीयर बनण्याचे स्वप्न पाहून पुढे त्यांनी एमजीएम कॉलेज नांदेड येथे बी.ई. मेकानिकल ला प्रवेश घेतला. माणसांशी संवाद साधने हा त्यांचा मूळ स्वभाव, एकदम मित्तभाषी सर्वांना हवेहवेसे वाटणारे, नवयुवकाना प्रेरणा देणार व्यक्तिमत्व ते कोण असतील तर आदरणीय गजानन गिरी. त्यांचा पाठीमागचा इतिहास जर आपण पाहिला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी हे सर्व विश्व निर्माण केले. त्याचे कारण कष्ट, मेहनत आणि जिद्द एखादी गोष्ट आपण ती मिळवायची असेल तर त्यासाठी मनामध्ये जिद्द ठेवून ते सिद्ध करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे असं मला गजानन गिरी नेहमीच म्हणतात. कारण प्रत्येकाच्या आई-वडिलांचे स्वप्न असते की, माझा मुलगा किंवा मुलगी कुठेतरी शिकून मोठा झाला पाहिजे. गजानन गिरी यांचे वडील एका दुकानांमध्ये मुनीम म्हणून काम करायचे तेव्हा त्यांना पाच हजार रुपयांचा पगार मिळायचा. आई-वडील निरक्षर असताना सुद्धा आपल्या मुलाला कधीच कमी पडू दिले नाहीत.

२०१६ साली नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटांमधील आकाश ठोसर म्हणजे परश्याच्या भूमिकेमध्ये काम करणाऱ्या आकाश ठोसर आणि गजानन गिरी यांचा चेहरा हुबे हुब मिळता जुळता आहे. गजानन गिरीला हे वाटलं नव्हतं की, मी परशासारखा दिसायला आहे, परंतु जेव्हा त्यांचे मित्र म्हणायला लागली परश्या परश्या तेव्हा त्यांनी परशा चा फोटो पाहिला आणि आरशा पुढे जाऊन पाहता तर काय त्यांना सुद्धा मिलता जुळता चेहरा वाटू लागला. मग एका मित्रांनी म्हटलं की सैराट टू चित्रपटात तुला काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे तेव्हा गजानन गिरी हसायला लागले आणि म्हणायला लागले की, आपल्यासारख्या गरीब माणसांना अशी संधी उपलब्ध होणे मला तर खरं वाटत नाही. मग पुढे एकदा ओम गिरी आणि गजानन गिरी यांनी टिक टॉक वर व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केला. त्यावेळेस त्यांना सोशल मीडिया विषयी काही माहिती नव्हत. परंतु मित्रांच्या सहवासात आल्याने भरपूर काही शिकता येतं परंतु जे चांगलं शिकता येतं ती चांगली संगत हवी असं म्हणायला काय हरकत नाही तेव्हा गजानन गिरी यांना चांगली संगत मिळाली म्हणून आज ते सर्वांना परिचित आहेत. जेव्हा त्यांनी त्यांचं फर्स्ट युजर तयार केलं तेव्हा त्यांना ४७ हजार लोकांनी सबस्क्राईब केलं. जेव्हा इंजिनिअरिंग करायचे तेव्हा आई-वडिलांनी स्वतःच्या कष्टातून गजानन गिरी यांना एका बचत गटामधून पैसे उचलून देऊन लॅपटॉप घेऊन दिले. आज तो लॅपटॉप गजानन गिरी यांच्या यशामागे खूप मौल्यवान वस्तू ठरली. कारण कष्टाची भाकर ही माणसांना आनंदाची झोप घेण्यासाठी मोकळा श्वास देते. आई-वडिलांनी घेऊन दिलेल्या लॅपटॉप त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून युट्युब चालवण्यासाठी परिपूर्ण त्याचा उपयोग केला. पुढे पुढे गजानन गिरी हे सोशल मीडियामध्ये त्यांना ज्ञान मिळू लागले आणि त्यांचे चाहते सुद्धा वाढू लागले. एकदा त्यांना अमोल जैन यांचा कॉल आला आणि ते म्हणत होते की, माझ्याकडे तुम्हाला युट्युबवर काम करण्यासाठी काम आहे .त्यामध्ये दोन रोल आहेत तुम्ही तयार आहात का? त्यामध्ये एक पुरुषांचा आणि एक स्त्रीचा रोल आहे तेव्हा गजानन गिरी आणि त्यांना होकार दिला मी दोन्ही पण रोल करायला तयार आहे. पुन्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला की, पुरुषांचा मी रोल करेल आणि दुसरा रोल आहे ते म्हणजे माझ्या पत्नीला देईल. त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी साथ देणाऱ्या गुंजनताई गजानन गिरी आणि गजानन गिरी ह्या तेव्हापासून लोकांपर्यंत अनेकांना हसवण्यासाठी कारणीभूत ठरले. आज पाहता जग हे सोशल मीडियाचे बनलं प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. त्या मोबाईलच्या माध्यमातून अनेक जण जगामध्ये काय चाललंय हे पाहत असतात. त्यामध्येच गजानन गिरी आणि गुंजन गिरी यांचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर वायरल होतात तेव्हा मात्र माणसं वेळातला वेळ काढून त्यांचे रिल्स पाण्यासाठी सज्ज असतात.

आज त्यांचे एवढे फॉल्लोवर्स बनलेत की, हिंदी भाषेमध्ये त्यांनी बनवलेले व्हिडिओज आहेत त्यांचं मोज अकाउंट आहे त्याचे फॉलोवर्स आहेत दोन करोड. त्यानंतर हिंदीमध्येच फेसबुक अकाउंट आहे त्याचे फॉलोवर्स बदले ४३ लाख पुन्हा हिंदीमध्ये एक यूट्यूब चैनल आहे त्याचे सबस्क्राईब बनले १३ लाख, मराठीमध्ये बनवलेले व्हिडिओ मोज ह्या चैनल ४० लाख, फेसबुक या चॅनलला १ लाख ८६ हजार, युट्युब या चॅनलला ३ लाख ३१ हजार चाहते आहेत. एवढे चाहते हे कशामुळे बनले असतील तर त्यांनी आपली महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती कधीही हरवू दिली नाही. त्याचे कारण गजानन गिरी यांच्या डोक्यावर टोपी वापरण्याचे रहस्य वेगळेच आणि गुंजनताई गिरी यांच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली पडला नाही म्हणून आज जेवढा त्यांना मानसन्मान आहे. त्या माणसांना मागे मी त्यांना विचारलं की, हे सर्व श्रेय तुम्ही कोणाला देणार तर त्यांनी हसून उत्तर दिलं की हे सर्व माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळालेलं एक आनंददायी गिफ्ट आहे असं म्हणायला मला काय हरकत नाही. त्या ठिकाणी मला सुद्धा आनंद झाला कारण जी माणसं आई-वडिलांच्या कष्टांची जाण ठेवतात ना त्या माणसांना या जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जरी गेल तरी मान मिळाल्याशिवाय राहत नाही.

दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेकांना आम्ही ताण-तणावांमध्ये जीवन जगताना पाहिलं. परंतु ताणतणाव येऊच नये ही जर आपल्या मनामध्ये प्रक्रिया निर्माण करायची असेल तर गजानन गिरी आणि गुंजन गिरी यांचे आपण व्हिडिओ जर पाहिलं तर जाती जातीमध्ये घराघरांमध्ये माणसा-माणसांमध्ये वाद होणारे हे नक्कीच टळतील हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्यांच्याकडे पाहताच माणसांच्या डोळ्यासमोर एक आनंदही आरसा निर्माण होतो. आणि गजानन गिरी हे सरळ आणि सोप्या पद्धतीने जीवन जगणारी माणस आहेत. दुसऱ्यांचं आपण वाईट करायचं नाही मग आपलं कधीच वाईट होत नाही अशी जर मनामध्ये भावना आपण ठेवलो तर आपण कधीच दुखी राहणार नाही. त्यांची ही तळमळ मला नेहमीच पाहायला मिळाली. माझ्या एका फोनला त्यांनी माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जनसेवक स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ वयवृद्धाना आधाराची काठी वाटप कार्यक्रमासाठी त्यांनी आमच्या गावी आले. त्यांनाही आमच्या गावी येऊन त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचं कारण ग्रामीण भागातील माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी पाहून त्यांना आश्चर्य वाटलं कारण, शहरी भाग हा स्वतःचा आणि मुलाबाळांचा फक्त विचार करणारा हा शहरी भाग आहे. परंतु ग्रामीण भाग असा आहे की, इथली माती ही माणुसकीची नातीगोती जपणारी ही भारतीय माती आहे. या भारतीय मातीमध्ये जर सर्वात मोठ स्थान जर कुठे द्यायच असेल तर ते ग्रामीण भागाला दिल पाहिजे. कारण इथली माणसं एकतर खोटी बोलत नाहीत आणि मिळालेल्या माणसांना त्यांचा जीव ओतून प्रेम देण्याचं काम करतात, हे सुद्धा गजानन गिरी यांना वाटायला लागल..!

आज पाहता गजानन गिरी यांना करोडो लोक ओळखतात. जगभरातील अनेकांनी त्यांना खूप वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दर्शवली त्याबद्दल ही नांदेडकरांची फक्त नुसती अभिमानाची गोष्ट नाही तर या भारत देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्या मातीतला हा मनुष्य एवढं करू शकतो. अनेकांच्या दुःखामध्ये तो आनंद पेरू शकतो तर याच्यापेक्षा आपण जन्माला येऊन काय करू शकतो एक ताजं उदाहरण जर काय असेल तर ते म्हणजे गजानन गिरी आज त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या चेहऱ्यावरचा अतिशय नम्रपणा, अहोभाव अनेकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारा आहे. त्याचं कारण नजर लागेल इतकं गुणवान पोरग त्यांच्या आई-वडिलांनी जन्म दिला. म्हणून मला वाटतं, एखाद्याला पुत्र असावा तर गजानन गिरी यांच्या सारखा एखाद्याला मित्र असावा तर गजानन गिरी यांच्या सारखा.

अशाच प्रगतीच्या वाटा तुमच्यासाठी खुलत रहाव्यात. एक-एक यशाचं पाऊल पुढे-पुढे टाकत जा आणि आयुष्यामध्ये एवढी भरारी घ्या की, यश सुद्धा म्हणलं पाहिजे की तू थांबणार का नाही मी थकलो पण तू का थकला नाही रे असं जोपर्यंत यशाला वाटणार नाही तोपर्यंत तुम्ही थकू नका. आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहोतच आदरणीय सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत गजानन गिरी सर आपणास आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, अंतकरणापासून, निर्मळ मनाने खूप खूप शुभेच्छा. नेहमीच आनंददायी जगा..!

 

 

लेखक
– युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड

संपर्क-7507161537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *