कंधार ; प्रतिनिधी
श्री शिवाजी विद्यामंदिर माध्यमिक प्राथमिक व मगदूमिया उर्दू प्रा शा कंधार येथे मातोश्री मुक्ताई धोंडगे यांची 59 वी पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री S.T. UNDRATWAD सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उर्दू विभागाचे मुख्याध्यापक मंजूर अहेमद सर, तसेच प्राथमिक विभागाचे जेष्ठ शिक्षक श्री भगवानराव शिंदे सर उपस्थित होते,
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीताने झाली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रदीप इंगोले सर यांनी केले, त्यांनी मातोश्री मुक्ताई व दिवंगत माजी खासदार व आमदार, जेष्ट स्वातंत्र्य सेनानी डॉ केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या कार्यावर सखोल असे मार्गदर्शन केले,
त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली, त्यानंतर शाळेतील जेष्ट शिक्षिका श्रीमती कुरुडे यांनी मातोश्री मुक्ताई यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर उर्दू विभागातील सहशिक्षक सरवरी सर यांनी मार्गदर्शन केले
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली,
त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना श्री Undratwad S.T. सर यांनी आधीच्या काळातील शिक्षण व्यवस्थे मध्ये असणाऱ्या अडचणी बद्दल मार्गदर्शन केले व इतक्या बिकट परिस्थिती मध्ये मातोश्री मुक्ताई यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला त्यानंतर श्री भांगे एन व्ही यांनी आभार मानले,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कासलवार सर यांनी केले ।।
या वेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते ।।