देव खरच आहे का ??
माझा मित्र जो पेशाने डॉक्टर आहे.. दोन दिवसापूर्वी त्याने मला पार्टीला बोलवलं होतं ,, मी त्याला म्हटलं , अरे मी येत नाही.. तुम्ही ड्रींक करणार ,नॉनव्हेज खाणार आणि मी माझा वेळ वाया घालवणार त्यापेक्षा मी काहीतरी छान वाचेन किवा लिहीन किवा भगवदगीता वाचेन..
त्यावर तो म्हणाला , अगं तु जगतेस कशी ?? .. हे खायचं , ते करायचं नाही.. माणूस म्हणून जन्माला आली आहेस तर आनंद घे की.. मी त्याला म्हटलं ,मी आनंदच घेतेय फक्त तुझा आणि माझा आनंद घ्यायची पद्धत वेगळी आहे.. माझ्या आनंद घेण्याच्या पध्दतीने मला दुख कधीही होणार नाही पण व्यसनं करुन आनंद घेण्याने दुख येउ शकतं..
आमच्या भगवदगीतेच्या क्लास मधे सांगितलेलं मला आठवलं , प्रभुपादाना त्यांच्या शिष्यांनी विचारलं होतं की शेवटीच्या क्षणी तुम्हाला कळलं की देव नाहीच आहे तर तुमचं आयुष्य वाया जाईल त्यावर प्रभुपाद म्हणाले , आणि तुम्हाला कळलं , की देव आहे तर मग ??.. आयुष्यभर तुम्ही तर देवाचं नावही घेतलं नाही.. आम्ही तर chanting ( जप ) . ,Dancing ( नृत्यातुन आनंद ) , eating ( प्रसाद ) हे करुन आनंदच मिळाला कीं मग व्यसनात किवा पार्टीत वेगळा आनंद काय असतो ??.. आनंद घेत असताना किवा चांगल्या गोष्टी करताना नक्की काय करावं हे माहीत हवं..
कुठल्या लोकान्मधे उठबस करावी हेही कळायला हवं..
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्या तरीही योग्य मार्गदर्शन नाही किवा बेफिकीर वागणं यामुळे आपण भरकटत जातो आणि एकदाच मिळालाय मानव जन्म म्हणुन वाट्टेल तसं वागतो म्हणुन चांगल्या लोकान्मद्गे उठबस हवी.
पहा पुन्हा एकदा विचार करुन..
सोनल गोडबोले