जगात २५ जुलै १९७८ रोजी पहिली टेस्ट ट्युब बेबी लुई ब्राऊन ही जन्मास येवून कृत्रिम गर्भधारणा हे संशोधन यशस्वी झाले.संशोधक डाॅ.राॅबर्ट एडवर्ड यांच्या अथक परीश्रमाला यश मिळाले.यांना २०१० रोजी नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले.जगातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबी जन्मानंतर फक्त ६७ दिवसांनी भारतात कोलकात्ता येथे कानुप्रिया अग्रवाल उर्फ दुर्गा या परखनली शिशू जन्मास आला.संशोधक डाॅ.सुभाष मुखोपाध्याय [चटर्जी]यांच्या अथक संशोधक प्रयत्नांना यश आले.पण त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली.त्यांना इंटरनॅशनल काॅन्फरन्सला जाण्यापासून रोकण्यात आले.या अपमानजनक परिस्थितीस कंटाळून १९ जुन १९८१ ला आपल्या राहत्या घरी आत्महत्या करावी लागली.त्या नंतर डाॅ.टी.सी.आनंदकुमार यांनी १९८६ साली पहिल्या टेस्ट ट्युब बेबीच्या जन्माचे संशोधक संबोधण्यात आले,पण त्यांनी स्वतः होवून सांगीतले की मी डा.सुभाष मुखोपाध्याय यांच्या नोट्स व प्रबंधावर आभ्यास करुन हे यश मिळविले असे प्रांजळ मत व्यक्त केले.त्यानंतर डाॅ.सुभाष मुखोपाध्याय यांनाच पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचै जनक म्हणतात डा.टी.सी. आनंदकुमार यांनी मनाचा मोठेपणा दाखवत खरे बोलुन सर्वांना सांगीतल्याने शेवटी का होईना पण डाॅ.सुभाष मुखोपाध्याय यांच्या बुध्दीमत्तेस देशवासीयांना दाद द्यावी लागली ही खरी शोकांतिकाच गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी आपल्या शब्दबिंब काव्यातून मांडली. पहिल्या जागतिक टेस्ट ट्युब बेबीचे व पहिल्या भारतीय परखनली शिशू संशोधकांचे मनःपुर्वक आभाराभिनंदन!आज ४५ वा टेस्ट ट्युब बेबीच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन!