श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी ता.कंधार या संस्थेची प्रेरणा ॥ज्ञानमाता मातोश्री मुक्ताई धोंडगे॥यांची पुण्यतिथि निमित्त संस्थेच्या सर्व शाखात साजरी होत आहे.या माऊलीने श्री शिवाजी कॅालेज कंधारची मान्यता रद्द झाल्या नंतर आपल्या बाळ केशवाला केशवसखा गुरुनाथा सोबत आपल्या जीवा पर्वा नकरता मुंबईला पाठवले.कॅालेजला मान्यता मुंबई येथे मिळाली.पण……२६जुलै १९६४ साली बहाद्दरपुरा ता.कंधार येथे रविवार सायंकाळी ६-३० वाजता मातेश्रीने या जगाचा निरोप घेतला.शेवटीची माय लेकराची भेट झाली नाही.हे शल्य आजही धोंडगे साहेबांच्या मनात आहे.जयक्रांति.
1999 साली कारगील युद्धात पाकड्यांना चारीमुंड्या चीत करुन विजय मिळवला. या युद्धातील भारतीय वीरांच्या शौर्य आणि पराक्रमावर विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेली छायाचित्रे संकलीत करुन महाराष्ट्रात एक अनोखा संग्रह करुन मन्याडी कल्पकता दाखवून भारतीय वीर जवाना प्रती संवेदना जागृत करुन देशभक्तीची प्रेरणा भविष्यात भारतीयांच्या मनी प्रेरणादायी तेवत रहावी.या साठी मराठी, तेलगु, गुजराती, इंग्रजी, हिंदी अशा भाषेतून प्रकाशित नियतकालिकांमधून छायाचित्रांचा हा संग्रह निर्माण झाला.तो आज ही पाहता येतो या संग्रहात डोकावून पाहिल्यानंतर जवानांची यशोगाथा आपल्याला प्रेरणादायी आहे. या संग्रहातील चित्राचे प्रदर्शन श्री शिवाजी विद्यालय बारुळ, गुराखीगड, व्दादशभुजा वैष्णव देवी यात्रा महोत्सवात, सहीत अनेक ठिकाणी प्रदर्शन भरवून भारतीय तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत्त केले. कारगील युद्धात धारातिर्थी पडलेल्या 519 शहीद वीरांची नावे या संग्रहात आहेत.भारतीय वीरांच्या यशोगाथेस मानाचा मुजरा व शहीद वीरांच्या त्यागास विनम्र अभिवादनांजलि! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार एमेकर परिवार