सावळेश्वर ता. कंधार जि. नांदेड येथील शेतकरी पांडुरंग कदम हे शेतात काम करत असताना विज पडुन मृत्यूमुखी पडले. कंधार लोहा तालुक्यात पावसाचा मोठा कहर सुरू आहे . मन्याड नदीला महापुर आला असून बहादरपुरा येथिल पुलावरून पाणी जात आहे यामुळे कंधारवरून फुलवळ मुखेड उदगीर जाणारा संपर्क तुटला आहे . तसेच घोडज येथिल जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे मात्र नविन पुलामुळे या मार्गावरील वाहतूक चालू आहे
तसेच कंधार मार्ग बारुळ गडगा मुखेड देगलूर हा मार्ग बंद झाला आहे . मानसपूरी येथिल पुलावरून पाणी वाहतं आहे . त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे .
नदीपात्रात ओढयात नागरीकांनी जाऊ नये विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांन करण्यात आले आहे .