Post Views: 64
नांदेड -तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात धम्मचळवळीला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जगातील बौद्ध राष्ट्रांचा धम्माभ्यास करण्यासाठी बौद्ध भिक्षू आणि उपासक उपासिका विविध बौद्ध राष्ट्रांना भेटी देऊन तेथील जीवनपद्धती, त्या देशाचे भौगोलिक महत्त्व तसेच बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो आपल्या भिक्खू संघासह पंचवीस उपासक उपासिकांना घेऊन थायलंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
येथील रेल्वेस्थानकावरुन दसदिवशीय थायलंड धम्माभ्यास सहलीसाठी गेलेल्या उपासक उपासिकांमध्ये कांचन हनुमंते, ज्योतीबा हनुमंते, शांताबाई एंगडे, सुमनबाई परघणे, सुभाष गायकवाड, सुरेखा गायकवाड, विठ्ठल बुद्धेवार, कुसुम बुद्धेवार, कविता हटकर, पद्मीनबाई धुळे, रुख्माजी धुळे, किशन कांबळे, विमलबाई कांबळे, सुधाकर सोनसळे, शांता सोनसळे, सतीश हटकर, हिरामण कांबळे, स्वप्नील हनवते, पांडूरंग सोनाळे, उज्ज्वला सोनाळे, ज्ञानेश्वर घोडगे, कल्पना घोडगे, सदाशिव बनसोडे, चौतराबाई बनसोडे यांचा समावेश असून एक आॅगस्टपर्यंत हा अभ्यास दौरा चालणार असल्याचे भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सांगितले.