Post Views: 42
नांदेड – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष साहित्यीक, लेखक, कवी गंगाधर ढवळे सर यांची शहरात होणाऱ्या “संघटीत बनो, संघर्ष करो” परिषदेच्या संयोजन समिती अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला या वेळी राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा शेख, मार्गदर्शक बालाजी बनसोडे, जिल्हा सहसमन्वयक बालाजी पा.भांगे, ता.अध्यक्ष संभाजी पवार, संयोजक लहू पंदलवाड, संतोष घटकार, वाय.पी.कुलकर्णी, सुभाष राठोड,गिजे सर,अंबर फुलसे सर, मुंढे सर, राहूल बनसोडे सर,बोईनवाड सर, मारोती बट्टलवाड सर, जोशी सर, जाधव सर, राठोड सर, वामन पवार यांच्यासह अनेक शिक्षक सैनिक उपस्थित होते.
शहरात लवकरच सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने संघटित बनो संघर्ष करो’ या एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी येथील साहित्यिक समीक्षक गंगाधर ढवळे यांची निवड करण्यात आली. या निमित्ताने नवनिर्वाचित लोहा तालुका शिक्षक सेना कार्यकारिणीच्या वतीने ढवळे यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेचे स्वरूप कसे असेल याबाबत ढवळे यांनी माहिती दिली. तसेच शिक्षक सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीचा यथोचित सन्मान करण्यात आला. संघटनेच्या ध्येयधोरणांची आणि पुढील आंदोलनाचीही चर्चा यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली.