नांदेड ; प्रतिनिधी
अमरनाथ यात्रा तसेच चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ तसेच अधिक मासाच्या पावन पर्वा निमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या महाप्रसाद व धोंडे जेवण प्रसंगी सुदैवाने पाऊस न पडल्यामुळे शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला.यावेळी अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा उपक्रमातील अन्नदात्यांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी नांदेड येथे शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार पासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला होता.त्यामुळे अनेकांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. परंतु दिलीप ठाकूर यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्यक्रम करण्याचा निश्चय केला.सुदैवाने शुक्रवारी पाऊस न पडल्यामुळे महाप्रसादा मध्ये कोणताही व्यत्यय आला नाही.
जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रविण साले, ॲड. चैतन्य देशमुख, महेश खोमणे, विजय गंभीरे, अशोक धनेगावकर,व्यंकट मोकले,दिलीपसिंह सोडी,शीतल खांडील, अभिषेक सौदे,अनिलसिंह हजारी,प्रतापसिंह खालसा,सूर्यकांत कदम,राज यादव,अक्षय अमिलकंठवार, रुपेंद्रसिंघ साहू,शिवा लोट,सुषमा ठाकूर, शततारका पांढरे, वैशाली देबडवार या भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रतिभा राजेंद्र चौधरी परभणी,सतीश सुगनचंदजी शर्मा,हृदयनाथ सोनवणे,नागेश शेट्टी, स्नेहलता जैस्वाल,मुकेशसिंह तौर, गंगाधर फलटणकर, सुधाकर ब्रह्मनाथकर,अरविंद चौधरी यांनी अमरनाथ यात्रेत अन्नदान केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.दिलीप ठाकूर यांच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होणारे विनय भंडारी,बलवीरसिंह ठाकूर, आशिष काबरा,ॲड.चिरंजीलाल दागडिया,डॉ. मनोज भंडारी,लक्ष्मीकांत गोणे,शंकर परकंठे, सदाशिव पाटील,प्रा. नंदू मेगदे,दिलीप उत्तरवार,डी. एच.अग्रवाल, तुकाराम गायकर, सुहास क्षीरसागर,लक्ष्मीकांत पाठक,रवी पोतदार,भूषण जोशी,नंदिनी चौधरी,सुनंदा जाधव पांढरे,प्रगती निलपत्रेवार यांना गौरविण्यात आले.हभप राऊत महाराज,सनत महाजन, शशिकांत पाटील, गणेश कोकुलवार, महेश देबडवार, दिमाकाका देशमुख, जयवंत वाकोडकर यांच्या सह अनेक जणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराचे हेमंत गिते, नीरज चौहान, राजेशसिंह ठाकूर, जगतसिंह ठाकूर,अभय शृंगारपुरे, सुभाष देवकते,कामाजी सरोदे,सुरेश शर्मा, कैलाश महाराज, सुरेश निलावार,रुपेश व्यास, विजय वाडेकर,अशोक साखरे,डॉ. भुजंग पन्नासे,राजेश यादव,विलास वाडेकर,प्रियंका मामीडवार, ज्योती गवारे,अनघा शृंगारपुरे,अंजली चौधरी यांनी परिश्रम घेतले.