ठाणे शहरात आणि ठाणे- खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गावर जागोजागी पडलेल्या खडयाची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली पाहणी

ठाणे ; प्रतिनिधी

ठाणे शहरात आणि ठाणे- खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गावर जागोजागी पडलेल्या खडयाची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली पाहणी

 

 

ठाणे शहरात आणि ठाणे- खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आज रविवारी सकाळी मी व्यक्तीशः या मार्गाला भेट देऊन खड्डे बुजवण्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देश दिले. तसेच जिथे शक्य आहे तिथे रस्ता दुरुस्ती करून अतिरिक्त मार्गिका सुरू करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे कडून भिवंडीकडे जाताना मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन मार्गावरील सर्व खड्डे बुजवून हा मार्ग गर्दीच्या वेळी वापरण्याच्या सूचना दिल्या. रंजनोली पुलाखालून अवजड वाहनांना गाड्या फिरवून घेता याव्यात यासाठी अतिरिक्त जागा तयार करण्याचे निर्देशही यावेळी दिले. तसेच कोणते काम कुणाच्या अखत्यारीतील आहे त्यांचा मुलाहिजा न बाळगता लोकांना होणारा त्रास तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना ताबडतोब कराव्यात असेही अधिकाऱ्यांना सांगितले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ ठरवून द्यावी अशा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *