व्यक्तीला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य ,शिक्षण यांची आवश्यकता असते. परंतु एवढ्या गरजा वर न थांबता मानवाला मन: शांतीची आवश्यकता आहे. प्रत्येक मानवाला मन :शांती मिळाल्यास तो आयुष्यभर आनंदी राहतो.
ज्यांना मन:शांती मिळत नाही त्यांचे शारीरिक नुकसान झालेले दिसते. इच्छाअपूर्ती ,धननाश ,आघात, वेगवेगळ्या व्याधी, कामादि विकार अन्याय होणे, बळजबरी होणे, धनहरण, अपहरण ग्रहपिडा, नैसर्गिक आपत्ती, इत्यादी कारणामुळे व्यक्तीला मन: शांती लाभत नाही , काही लोक समाधानी असतात. बरेच लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दु:खी आहेत म्हणून मन: शांतीचा शोध घेऊन आपले जीवन चांगले जगावे, आजही हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. अनेकांना अपमान निंदानालस्ती, प्रेमभंग,
दारिद्र्य , इत्यादी कारणामुळे लोकांची मनातील मन:शांती निघून जाते. मनासारखा जोडीदार न मिळणे,सत्ता संपत्ती न मिळणे, मनामध्ये अनेका बदल द्वेष निर्माण होणे, आणि हेच मन :शांतीचे काही काळानंतर शत्रू तयार होतात. काही लोकांना मुलगा नसतो, काहीना मुलीच असतात, लाॅटरी लागली की आपल्याला सुख मिळेल असे वाटते. काही लोकांना विवाह झाला की सुख मिळेल असे वाटते; पण त्यानंतर दुःखात वाढ होते. सुख मिळत नाही, पैसा ,गाडी, बंगला या गोष्टी काही काळ सुख देतात परंतु त्यानंतर दुःखा: ला सुरुवात होते. म्हणून मन :शांत ठेवा. तरच आपण चांगले आयुष्य जगू शकतो मी इतरापेक्षा हुशार व बुद्धिमान आहे माझ्याकडे भरपूर संपत्ती व ज्ञान आहे या माध्यमातून अनेकांनाा अहंकार निर्माण होतो. आपल्यापेक्षा कोणीही मोठा नाही यातून राक्षसी प्रवृत्ती जागी होते. त्यामधून अनेक मुसोलिनी, हिटलर तयार होतात,अंहकारामुळे रावणाचे राज्य गेले .कंसाचा वध झाला. शकुनी मामा आयुष्यभर दुसऱ्यांच्या राज्यात राहिला. कधीच त्यांनी स्वतःचा विचार केला नाही? सतत वाईट गोष्टी सांगून दुर्योधनाला बिघडून टाकले,आणि शेवटपर्यंत मन: शांतीचा शोध घेता आला नाही, रामायणामध्ये कैकयीने शेवटपर्यंत आपल्या मनासारखंच केले, म्हणून मन शांत ठेवले नाही.माझेच मुलं राज्यकारभार करतील या हट्टा पायी मन :शांती दूर निघून गेली आणि कायमची हेकेखोर राणी म्हणून सर्व परिचित झाली .मन शांत असेल तर इतिहास वेगळा निर्माण झाला असता अशी कितीतरी उदाहरणे आहेत, अहंकारामुळे माणूस लयाला जातो. जगामध्ये प्रत्येकाला प्रेमाची पाण्या पेक्षा जास्त गरज आहे. कोणीही काही आपल्याबद्दल बोलले तर त्याकडे दुर्लक्ष करावे. कमी बोलावे व विचारपूर्वक बोलावे, कारण आपले नाक नीट आहे मग कोणी नकटे म्हटलं तरी काय बिघडले? नेपोलियन बोनापार्ट हा सामान्य सैनिक परंतु विचाराकृती या हत्याराच्या आधारे जगजेत्ता बनला .नाही हा शब्द त्याला माहीत नव्हता. मन :शांती मुळे अनेक रोग नाहीसे होतात. छोट्या पदावरला माणूस मोठ्या पदावर जाण्यासाठी वेगवेगळ्या अपेक्षा करतो. आपली बुद्धी कमकुवत असूनही दुसऱ्याचं पाहून मोठी उडी घेण्याच्या प्रयत्नात भ्रष्टाचार करतो. आणि एके दिवशी बरेच दूरवर जाऊन आपटतो. नंतर मन :शांतीचा नाश होतो .असे संकटे माणूस स्वतः आपल्यावर ओढून घेतो.आपल्या साध्या घराकडे न पाहता इतरांच्या टोलेजंग इमारतीकडे पाहतो .तसेच आपली असलेली जिरायती जमीन न पाहता इतरांच्या बागायती जमिनीकडे लक्ष देतो . व मनात दुखी होतो, तसेच मोटरसायकलवर जाणारा व्यक्ती चार चाकी गाडीची अपेक्षा व्यक्त करतो. सिकंदराला एवढी हाव होती तो जग जगण्याच्या प्रयत्नात मनामध्ये अहंकार निर्माण केला आणि वाटेतच बॅॅबीलोन येथे तो मरण पावला आणि मन :शांती घालून बसला, यामुळे मनुष्य आपल्या नातेवाईकापासून दूर जातो .कोणताही वेळी कोणा वर अचानक राग काढतो ? आणि एके दिवशी व्यसनी बनतो, या सगळ्याचा मूळ पाया आहे मन :शांती स्थिर ठेवता आली नाही. त्यामुळे सर्व काही मिळून सुद्धा अनेक जण चुकीच्या मार्गाने जाऊन आपला जीवनाचा प्रवास चुकीच्या पद्धतीने करतात ;आणि त्याचा त्रास इतरांना होतो म्हणून मन: शांतीचा शोध घ्या .जेवढे आहे तेवढ्यात समाधान माना. *तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या* आपले अंथरूण पाहून पाय पसरावे .तरच सर्व चांगले होईल.
*शब्दांकन*
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान
खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड