डॉ. आंबेडकर नगरात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त काव्यपौर्णिमा कार्यक्रम

नांदेड – 

शहरातील डॉ. आंबेडकर नगरात  सुमेध कलामंच, ज्येष्ठ नागरिक संघ, रमाई महिला मंडळ यांच्या सहभागाने बुद्धसं बुद्ध विहार येथे काव्यपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा साहित्यिक  प्रशांत गवळे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे गंगाधर ढवळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शामराव वाघमारे, सुमेध कलामंचाचे अध्यक्ष कृष्णा गजभारे, सचिव गंगाधर वडने, कोषाध्यक्ष मधुकर हनवते, उपाध्यक्ष भगवान वाघमारे,रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरी सरोदे, सचिव प्रतिभा हटकर, उपाध्यक्षा कमलाबाई हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प, पुष्पहार अर्पण करून दीप व धूप पूजन करण्यात आले. यावेळी सुमेध कलामंच, ज्येष्ठ नागरिक संघ, रमाई महिला मंडळाकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.         

               बुद्ध विहारात सामुदायिक त्रीसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर  संजय कदम यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. शेषेराव वाघमारे यांनी ‘कणा कणांनी ज्ञान वेचूनी’ हे गीत तर ‘डोले भिमाचा झेंडा निळा’ हे गीत भगवान वाघमारे यांनी गायले. भाद्रपद पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर येथून सहभागी झालेल्या कवयित्री सुधा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा या कार्यक्रमात अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, बी.एल.खान, अनिता भोसले, रुपाली वैद्य/वागरे, आनंद चिंचोले, बाबुराव पाईकराव यांनी सहभाग नोंदवला तर हा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यासाठी पांडूरंग कोकुलवार, शंकर गच्चे, मारोती कदम, कैलास धुतराज,  प्रयत्न केले. झूमवरील आॅनलाईन काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र आनंद चिंचोले यांनी हाती घेतले तर आभार अनुरत्न वाघमारे यांनी मानले. 


         डॉ. आंबेडकर नगरातील  बुद्धसं बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म  या ग्रंथाचे वाचन सुरू आहे. आजच्या भागाचे वाचन करण्यात आल्यानंतर भाद्रपद पौर्णिमेनिमित्त विहारात खीरदान करण्यात आले.  यात आंबेडकर नगरातील महिलांचा सक्रीय सहभाग होता. यावेळी रमाई महिला मंडळाच्या उमाताई रुंजकर, लक्ष्मीबाई ससाणे, विठाबाई येडके, कमलबाई गायकवाड, बबिता सोनकांबळे, मंजुळा सरोदे, रागिणी वडने, पार्वती हिंगोले, शेषाबाई यशवंते, आम्रपाली ढेंबरे, शिला वाघमारे, गयाबाई कांबळे, कबिरा वडने, सोनाबाई यशवंते, शितल गोडबोले, राखी यशवंते, मिनल गोडबोले, कविता सोनकांबळे आदी महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *