कंधार ( ता. प्र. ) होमगार्ड म्हणून 21 वर्ष आणि 14 वर्षे पलटण नायक म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावल्यानंतर गुंडेराव खेडकर यांची कंधार तालुका समादेशक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेल्या 21 वर्षापासून गुंडेराव गोविंदराव खेडकर यांनी होमगार्ड म्हणून गेल्या 14 वर्ष पलटण नायक म्हणून अशी 35 वर्षे प्रामाणिकपणे अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा तसेच दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत गेल्या 20 वर्षापासून अत्यंत चोख असे होमगार्ड बंदोबस्ताचे योग्य असे नियोजन त्यांनी केले असल्याने त्यांची कंधार लोहा तालुका समादेशक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून आता त्यांना 3 स्टार मिळाले आहेत.नुकतेच त्यांना अविनाश कुमार भा.पो.से.जिल्हा समदेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिकारी नांदेड यांच्या सहीचे नियुक्ती पत्र इन्चार्ज अधिकारी परिहार व शेटे साहेब यांच्या उपस्थितीत खेडकर यांना देण्यात आले असून खेडकर हे कर्तव्यदक्ष,प्रामाणिक आणि सिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकतेच घाटकोपर मुंबई येथील त्यांच्या मुख्यालयी छडी,कवायत तसेच तलवार कशी चालवावी, पिस्तूल कशा प्रकारे वापरायचा याचे पंधरा दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा कंधार येथे त्यांच्या होमगार्ड मित्र परिवाराकडून एका कार्यक्रमात भव्य असा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी त्यांचे सहकारी पलटण नायक भीमराव जोंधळे,राजकुमार कदम, पीटी प्रशिक्षक शिवाजी गवळे,प्रेरक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा होमगार्ड पांडुरंग सोनकांबळे, चक्रधर घुगे,सलीम शेख,रघुनाथ करेवाड, दिपक लोखंडे,शंकर बामणवाड,महेबुब शेख,नारायण केंद्रे,नामदेव घुमे,भानुदास केंद्रे,सुरेश गीते,शेख गुलाम,स्वामी,मानेवार,तळनिकर माया कदम,सुमन फुले, द्रोपदा पवार,अनिता येंगडे,राधा नीलेवाड,पदमिन गायकवाड यांच्यासह सहकारी मित्रांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग सोनकांबळे यांनी केले तर दिपक लोखंडे यांनी उपस्थतांचे आभार मानले.