आताच बीड पाथरी हुन नारायण रहाणे माझे वाचक ( दहावी नापास ) त्यांचा फोन आला.. सचिन सर मला मॅडम शी बोलायचय.. मी फोन घेतल्यावर समोरुन गावरान भाषेत वाक्य आलं मॅडम तुम्ही माझा बाप आहात.. युटुबवर तुमची बिनधास्त मुलाखत ऐकली आणि मला माझा बाप आठवला..त्यांचं ते वाक्य माझ्या काळजाला भेदुन गेलं… अनेकांनी माझ्यात अनेक गोष्टी पाहिल्या पण बाप पहाणारा हा पहिलाच वाचक .. दहावी नापास हे मी यासाठीच लिहीलं कारण फार शिक्षण नाही , उच्चार एकदम वेगळेच पण तरीही बुध्दीमत्ता आणि समोरच्याला द्यायचा आदर दिसला जो कदाचित उच्च शिक्षीत व्यक्तीकडे सुध्दा नसेल..
ते म्हणाले , माझा बाप समोर बसुन मला सेक्स म्हणजे काय सांगायचा .. सगळं नॉलेज त्याने मला योग्य वयात दिलं होतं.. तुमची मुलाखत ऐकताना मला समोर मला माझा बाप दिसत होता.. मला ३ मुलं आहेत आणि आता मला हेच करायचय पण जे तुम्ही सांगता किवा लिहीता ते मला जमणार नाही म्हणुन तुमची पुस्तके मला घरात ठेवायची आहेत.. एका खेड्यातला माणुस जेव्हा असा उंची विचार करतो तेव्हा मात्र मी योग्य दिशेने काम करत आहे याचं समाधान मिळतं..
उच्चशिक्षीत वाचक जेव्हा पुस्तकाला कव्हर घालुन पाठवा मॅडम असं म्हणतात त्यांनी हा लेख वाचुन पुन्हा नव्याने विचार करावा.. एकीकडे भगवदगीता आणि दुसरीकडे लैगिकता दोन्हीचा अभ्यास करताना या दोन्हीची समाजाला गरज आहे हे लक्षात येतं…माझ्या वाचकांना सांगेन लैगिकतेवर बोलायला किवा समजुन घ्यायला मागे राहु नका..
आपल्या मुलांना पुढच्या पिढीला याचं योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आधी आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे…
नारायणजी सारखी व्यक्ती ही समाजासाठी आदर्श आहे.. त्यांचे विचार त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना ऐकून बनवले आहे जे खूपच दर्जेदार आहेत.. Extra marrtial affair कडे पहाण्याचा दृष्टिकोन मीरा सागर ने बदलवायला सुरुवात केली आहे आणि त्याच कपल ने शृंगारिक सेक्स कसा असावा त्यातील सौंदर्य कसं जपावं, त्याची स्वच्छता कशी राखावी याही गोष्टी शिकवल्या आहेत ज्या तितक्याच अभ्यासपूर्ण आहेत .. माझ्या वाचकाना सांगेन आपला बाप एकच आहे आणि तो म्हणजे भगवंत .. त्याला कधीही न विसरता आपण वैचारिक दृष्ट्या इतकं स्वतःला समृद्ध करा की त्या बापाला आपल्यात त्याचा बाप दिसेल..
मला बाप समजणाऱ्या माझ्या बाप वाचकांना मनापासून दंडवत.. नारायणजी तुम्हाला हे पाठवते आहेच तुम्ही असेच रहा अगदी निर्मळ आणि स्वच्छ पाण्यासारखे.. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अमृत आहे..मी कायमस्वरुपी माझ्या हृदयात त्याची पुजा करेन..
सोनल गोडबोले. लेखिका, अभिनेत्री