नांदेड दि. 8 जिल्ह्यातील भोकर,मुदखेड व उमरी तालुक्यातील भुयारी मार्ग, रस्ते व ड्रेनेज अशी 11 कामे रखडल्याने शेतकर्यांची गैरसोय ,वाहतुकीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे रखडलेली ही कामे तात्काळ करा अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने दक्षिण मध्यरेल्वे नांदेड विभागाच्या व्यवस्थापक नीती सरकार यांना दिला यावेळी आपतग्रस्तांनीही भेट घेऊन होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली यावेळी कामे गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
भोकर मतदार संघातील भोकर,मुदखेड व उमरी तालुक्यातील अशी रेल्वे विभागाशी संबंधित 11 कामे सहा महिने ते वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र पाच ,सहा वर्षांचा कालावधी झाला तरी कामे अपूर्ण आहेत यामुळे विशेषतः शेतकर्यांची होणारी गैरसोय तसेच वाहतुकीचा प्रश्न पाहता जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,मारोतराव कवळे,रामचंद्र मुसळे ,माधव कदम ,सरपंच कैलास पाटील ,उपसरपंच जयंत थोरात आदी शिष्टमंडळाने बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी दक्षिण मध्यरेल्वे नांदेड विभागीय कार्यालयात व्यवस्थापक नीती सरकार यांची भेट घेतली .
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी 30 मे रोजी जिल्ह्यातील दक्षिण मध्यरेल्वे नांदेड विभागीय कार्यालयात रेल्वे अधिकारी व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गोरठा, जामगाव, भोकर, थेरबन, जाकापूर,बोरगाव, बेंबर, जांभळी, खांबाळा, इजळी व पाथरड येथील रेल्वेगेट ऐवजी भुयारी रेल्वे मार्ग करण्याची कामे मागील अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांमुळे पावसाळ्यात होणाऱ्या स्थितीची जाणीव करून देत ही सर्व 11 कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना केली होती त्यावेळी रेल्वे प्रशासनाने ही सर्व कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले होते 4 महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्यापही ही 11 कामे जैसे थे स्थितीत असून कोणतीच कारवाई केली नसल्याकडे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांचे लक्ष वेधले याबाबत त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. तसेच आपतग्रस्तांनीही पावसाळ्यात त्यांना होणाऱ्या गैरसोयीची जाणीव करून दिली यावेळी व्यवस्थापक नीती सरकार यांनी कामे त्वरित करण्याचे आश्वासन शिस्टमंडळास दिले आहे.