प्रा. डॉ. रामकृष्ण बदने सर एक दिलखुलास व्यक्तिमत्व… -दादाराव आगलावे,मुखेड.

 

पणती सारखं स्वतः जळून तात्विक प्रकाश देणारे दिवे फार कमी झाले आहेत. पथ सोडलेली अन् पथ भंगलेली माणसं प्राद्यापक म्हणून घेत यंत्रासारखी वावरत आहेत. या यंत्राचे थवेच्या थवे असले तरी शिक्षण या मंत्राचा जप करीन शिक्षणाचे तंत्र सांभाळून नव्हे, शिक्षण हे एक सतीचं वान समजून शिक्षणातली व समाजातली घाण हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करणारी माणसं बोटावर मोजण्या इतकी का होईना पण आहेत, त्यातल्या एका माणसाचे नाव आहे प्रा. डॉ. रामकृष्ण दत्तात्रय बदने.
डॉ.रामकृष्ण दत्तात्रय बदने यांचा जन्म ५ ऑगस्ट १९६८ रोजी देवकरा पो.किनगांव ता.अहमदपुर जि.लातुर येथे वारकरी कुटुंबात झाला. त्यांनी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर, ता.मुखेड येथे ५ नोव्हेंबर २००७ ते ०४ नोव्हेंबर २०१२ पर्यंत प्राचार्य म्हणून संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर शिक्षण राठोड व तत्कालीन सचिव स्वर्गीय आमदार गोविंदराव राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम पाहिले. त्यांनी ‘नागार्जुन के कथा साहित्य में जनवादी चेतना’ या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून विद्यावाचस्पती ही पदवी मिळविली. ते संशोधन मार्गदर्शक-(गाईड ) असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.उपाधी प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम पाहिले. तसेच त्यांनी स्वा.रा.ती.म.विद्यापीठ येथे विभागीय समन्वयक म्हणूनही काम पाहिले. ते लेखन, वाचन, व्याख्यान, किर्तन,प्रवचन, समाजसेवा करत व्याख्याते -बहि:शाल व्याख्यानमाला :शाल व्याख्यानमाला समिती- स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड, विद्यार्थी कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासन वृध्द साहित्यिक व कलावंत निवड व मानधन वाटप समिती, जि.नांदेड, कोषाध्यक्ष – कै.मक्काजी नाईक राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार समिती, वसंतनगर, सदस्य – इंडियन रेडक्राॅस सोसायटी, मुखेड, मराठी मित्रमंडळ, मुखेड, कै.वसंतराव नाईक व्याख्यानमाला, वसंतनगर,मुखेड, मायबोली मराठी परिषद,मुखेडचे अध्यक्ष, तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती (शासकिय) तहसील, मुखेड, कै.भिमाई पुंडे स्मृति व्याख्यानमाला आदी ठिकाणी उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. या कार्याची पावती म्हणून त्यांना कै.राधाबाई राजुरकर गोल्ड मेडल,औरंगाबाद, गुरूगौरव- पंचायत समिती, मुखेड. वैद्यकीय संस्था व पुंडे हॉस्पिटलच्या वतीने गुणीजन व गुणगौरव, कै. मक्काजी नाईक गुणवंत कर्मचारी पुरस्कार. राज्यस्तरीय एकता गौरव – एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र. रोटरी क्लब गुणगौरव, महात्मा फुले समाजरत्न -किनगांव ता. अहमदपूर, नेहरू युवा केंद्र व जिल्हाधिकारी महिला बचत गट नांदेड विशेष कार्य, बहुजन गुणगौरव पुरस्कार, मुखेडचे मानबिंदू , मराठवाडा भूषण – वंजारी युवा संघटना,महाराष्ट्र राज्य,परभणी, उत्कृष्ट साहित्यिक – वंजारी युवा संघटना, महाराष्ट्र राज्य, परभणी. समाजरत्न – वंजारी युवा संघटना, महाराष्ट्र राज्य, लातूर, रक्तदान शिबिर उल्लेखनीय कार्य, विद्यारत्न – राज्यस्तरीय विद्यारत्न पुरस्कार, बुलढाणा, कै. सौ.इंदुमती देशमुख स्मृती वाङमय पुरस्कार, कुंटुर जि.नांदेड- ‘विमुक्त’ या संपादित पुस्तक, नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा मेळावा प्रशस्तीपत्र, आदर्श शिक्षक पुरस्कार, ग्रंथमित्र पुरस्कार – ग्रामीण महाविद्यालय, आदर्श शिक्षक पुरस्कार- जोशी इन्फोटेक एम. के. सी. एल. द्वारा, महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार – महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र. ज्ञानदिपाची दिपावली पुरस्कार – दरेगाव ता.नायगाव असे शेकडो पुरस्कार त्यांच्या खाती जमा झालेले आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत त्यात ‘नागार्जुन के कथा साहित्य में जनवादी चेतना’ – प्रथम संस्करण, बोलू काही थोरांविषयी, विचारधन यशस्वी जीवनाचे यांचा समावेश आहे तर त्यांनी संपादीत केलेले संस्कार वार्षिक विशेषांक, अर्वाचिन हिंदी काव्य- स्वा.रा. ती.म. विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी. विमुक्त (कर्मवीर किशनराव राठोड गौरव ग्रंथ), गीताअमृताचा प्रवाह रामकृष्ण महाराज आणी वारकरी संप्रदाय यांचा समावेश आहे. तसेच ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांडोळकर दर्शन -प्रस्तावना, गुरु विचार- शैक्षणिक मासिक: सल्लागार, साहित्य निर्झर वार्षिकांक : मार्गदर्शनही त्यांनी केले. त्यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथून ग्रामीण विभागातील आदर्श प्राध्यापक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल) कमळेवाडी येथे प्रथम प्राचार्य म्हणून काम पाहून विद्यानिकेतनची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक शिस्तीचे धडे देऊन त्यांचा विद्यार्थी वर्ग हा महाराष्ट्रात, महाराष्ट्र बाहेर व साता समुद्रा पलीकडेही गेलेला आहे. त्यावेळी त्यांचा एक उपक्रमशील प्राचार्य म्हणून महाराष्ट्र झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मलाही काम करण्याचे भाग्य मिळाले अत्यंत प्रेमळ व्यक्ती शिक्षिका भोक्ता इतकाच प्रेम करणारा. प्रा. डॉ. रामकृष्ण बदने त्यांनी ‘आई’ या विषयावर संबंध महाराष्ट्रभर व्याख्याने देऊन प्रेक्षकांच्या डोक्यातली घाण दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कीर्तनाच्या प्रबोधनातूनही ते आजतागायत समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. सरांच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दासाठी प्रेक्षक आपल्या कानांची ओंजळ करत असतात. रामकृष्ण बदने सर म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व, आगळ पीळ गप्पा मारतील पण या गप्पांना एक चव असते. पुन्हा पुन्हा त्यांच्या गप्पा ऐकायचा वाटतात रात्र सरली तरी तिचे संपत नाहीत. गारुड्याच्या पोतडीतून नवे नवे जादूचे प्रयोग बाहेर यावेत तसे त्यांच्या बोलण्यातून नव्या नव्या गोष्टी कळतात तो आनंद यांनी अनुभवला त्याला तो आनंद पुन्हा पुन्हा उपभोगायचा मोह होतो बदनेसर विविध अंगी हरहुन्नरी व्यक्तिमत्व. उत्कृष्ट साहित्यिक, प्रभावी वक्ता व मित्रांच्या सुखदुःखात सामील होणारा ते अतूट दोस्त आहेत. चंदनाचं झाड म्हणून ते आपल्या गुनाने व कर्तृत्वाने इतरांसाठी झिजले व झीजत आहेत, पण या झिजण्यात कष्ट उपसण्यात, दुःख सोचण्यात कोसळलेल्या आकाशावर पाय ठेवण्यात जो आनंद त्यांना मिळतो तो आनंद मन प्रफुलित व सुगंधित करणार आहे त्यांना हा आनंद सतत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना ५६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *