बोधन ते लातूररोड रेल्वे मार्ग चालू सर्वेक्षणातून शिरूर ताजबंद येथे रेल्वेस्थानक व्हावे ; रेल्वे संघर्ष समिती ची निवेदनाद्वारे मागणी

अहमदपूर ;  ( प्रा.भगवान आमलापुरे)  येथील रेल्वे संघर्ष समिती च्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांना बोधन ते लातूररोड रेल्वे मार्ग शिरूर ताजबंद येथे रेल्वे स्थानक व्हावे आशी निवेदनाद्वारे मागणी केली.

भारतीय रेल्वे नवीन काही मार्ग करण्यास सुरुवात करत आहे यातील मराठवाड्यातील काही मार्ग होतआहेत त्या मध्ये बोधन ते लातूर रोड या मार्ग चे पण नाव यादी मध्ये आहे सदरील मार्ग हा जळकोट, कुमठा, हाळी, लातूररोड असा जात असून सदरील मार्गावरील शिरूर ताजबंद हे गाव जोडण्यात यावे यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देऊन पाठपुरावा करावा शिरूर ताजबंद हे गाव या मार्गांमध्ये घ्यावे शिरूर ताजबंद येथे रेल्वे स्थानक करण्यासाठी पाठपुरावा करावा या रेल्वे स्थानकामुळे अहमदपूर तालुक्यातील नागरिकांची सोय होईल व येथील उद्योग व्यवसाय शेतीमालाला मोठ्या बाजारपेठ उपलब्ध होईल व इथला शेतीमाल मोठ्या बाजारपेठ जाण्यासाठी मार्ग मोकळा होईल. सदरील रेल्वे मार्ग शिरूर ताजबंद या मार्गे जाण्यासाठी व शिरूर ताजबंद येथे रेल्वे स्थानक करण्यासाठी प्रयत्न करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर रल्वे संघर्ष समिती चे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव सचिव बालाजी आगलावे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती शिवानंद हेंगने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान युवक चे तालुकाध्यक्ष दयानंद पाटील आशिष तोगरे प्रकाश ससाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *